spot_img
spot_img
29.9 C
New York
Friday, July 31, 2026

जातनिहाय जनगणनेसाठी प्रतिभाताई धानोरकरांनी घेतली राष्ट्रपतीची भेट…

खासदार प्रतिभाताई धानोरकरां सोबत खासदार वंशराव चौव्हान, नागेश पाटील,संजय सोडा उपस्थित

दिल्ली/चंद्रपूर

महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात वारंवार आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आर्णी च्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत देशात जातिनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली आहे. देशात विविध जातींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी अनेक आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्रात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने सुरू आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, म्हणून ओबीसी समाजाचेही आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात या आंदोलनाचा तिढा अजून सुटलेला नाही. अनेक आंदोलकांनी जात निहाय जनगणनेसाठी आपले प्राणही गमावले आहे. मागील अनेक वर्षापासून अद्यापही केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केलेली नाही. यामुळे केंद्र सरकारकडे कोणत्या जातीची किती टक्केवारी आहे याची कुठलेही आकडेवारी उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महामही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील जातिनिहाय जनगणनेचा निर्माण झालेला तिढा लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र शासनाने अहवाल मागून जातनिहाय जनगणना करून ५०% आरक्षणाची प्रतिबंधात्मक अट शिथिल करावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. या संदर्भात राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मु यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून भविष्यात या मध्ये सरकार मार्ग काढण्याचा प्रयास करणार अशा सूचना करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत खासदार वंशराव चव्हाण, खासदार नागेश पाटील, खासदार संजय सोडा यांची देखील उपस्थिती होती.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!