वरोरा : तालुक्यातील शेगाव ग्रामपंचायत हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेचा विषय बनत आली आहे. सध्या शेगाव गावात भरणाऱ्या आठवडी बाजारातील घाण परत एकदा ग्रामपंचायतच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण करणारी आहे.स्थानिक शेगाव (बु) मध्ये महिन्याच्या दर आठवड्याला आठवडी बाजार भरात असतो. आजूबाजूच्या ५० ते ६० खेड्यातील नागरिक या आठवडी बाजाराला येत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरत असतो. गावची बाजारपेठ पण चांगलीच मोठी असल्याने बाजाराही जोरदार भरतो. पण यात मात्र आठवडी बाजाराच्या प्रवेश दारावरच घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पण येते त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याच प्रमाणे या घाणीमध्ये डुकरे झोपत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत शेगाव ग्रामपंचायत किती जागरूक आहे हे लक्षात येते.
आठवडी बाजाराच्या ठेक्यातून ग्रामपंचायतला लाखो रुपयाचा महसूल मिळतो. पण त्याच्या निम्मा ही ग्रामपंचायत त्यावर खर्च करीत नसल्यामुळे ग्रामपंचायत या पैस्याचे करते तरी काय? हाच प्रश्न नागरिकांना व आठवडी बाजारात दुकानं लावणाऱ्या दुकानदारांना पडत आहे. तसेच याच आठवडी बाजारात एक शौचालय असताना विनाकारण दुसरे शौचालय बांधण्यात आले. पण त्या पैकी एकही उपयोगात नसल्याने नागरिकांना व खास करुन महिलाना उघड्यावरच बाथरूम ला बसावे लागते. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेली शेगाव ग्रामपंचायत आता तरी झोपेतून जागी होणार कि नाही यांचाच मोठा प्रश्न पडलेला आहे. वारंवार वृतपत्रात वृत्त प्रकाशित करून सुद्धा शेगावं ग्रामपंचायत ला कुठल्याच प्रकारचा फरक पडत नाही.






