रायगड : रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला असून, पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे.