वरोरा : उन्हाळा म्हटला कि पाणी टंचाई ची समस्या सुरू होते. पण वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) या गावासाठी ही समस्या काही नवीन नाही. मग तो उन्हाळा असो कि पावसाळा १२ ही महिने पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावीच लागते. पावसाळ्यात २-३ दिवसा नंतर नळाला पाणी येते तर उन्हाळ्यात ७-८ दिवस पाण्यासाठी नळाची वाट पहावी लागते. त्यातही एवढे दिवस वाट बघितल्या नंतर नळाला फिल्टर चे स्वच्छ पाणी मिळतच नाही.
पण सध्या मागील १५-२० दिवसा पासून वरोरा-चिमूर मुख्य महामार्गवर नळाची पाईपलाईन फुटलेली असून ग्रामपंचायत ला मात्र दूरस्ती करण्यासाठी वेळ नसल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे पाणी टंचाई व दुसरीकडे मात्र हजारो लिटर पाणी वाया जात असून अजूनही त्याची दुरुस्ती न केल्याने पाणी टंचाईची झळ मात्र गावकऱ्यांना सोसावी लागत असल्याने ग्रामपंचायत ने या कडे लवलर लक्ष देऊन पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करून वाया जाणारे हजारो लिटर पाण्याची बचत करावी. म्हणेज तेच पाणी गावकऱ्यांच्या उपयोगात येईल अशी मागणी गावकरी करीत आहे.






