spot_img
spot_img
21.2 C
New York
Friday, July 31, 2026

भद्रावती तालुक्यातील लोनारा गाव श्मशानभूमी विना, रस्त्यावर जाळले जाते प्रेत

आम आदमी पार्टी भद्रावती ने गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन

भद्रावती : आज देशात आजादी का अमृत महोत्सव संपूर्ण लोक साजरे करतात. परंतु एक गाव असा आहे जिथे अजूनही स्मशानभूमीच नाही. भद्रावती तालुक्यात लोणारा या गावात अजूनही स्मशान भूमी नाही म्हणून रस्त्याच्या काठालाच प्रेत जाळतात. ग्रामपंचायतला गावकऱ्यांकडून मागणी करून सुद्धा या गावात स्मशान देण्यात आले नाही. या विषयाची आम आदमी पार्टी भद्रावती ला गावकऱ्याकडून माहिती मिळाली. विलंब न करता दि. ११ जानेवारी ला आम आदमी पार्टी भद्रावती चे शिष्टमंडळ व समस्त गावकरी गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांच्या दालनात पोहोचले.

गावात स्मशानभूमी ची अत्यंत गरज आहे, रस्त्याच्या कडेला प्रेत जाळले जातात. संबंधित विषयाची गांभीर्याने लक्ष देऊन स्मशान भूमी तयार करून देण्यात यावे. अन्यथा संपूर्ण गावकऱ्याना घेऊन आम आदमी पार्टी रस्त्यावर प्रेत घेऊन आंदोलन करेल, असा इशारा आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर अध्यक्ष सुरज शहा यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे. या विषयी गांभीर्याने लक्ष घेत संबंधित अधिकाऱ्याला स्मशान भूमी तयार करण्यात यावे असे आदेश गटविकास अधिकारी साहेब यांनी दिले.

यावेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, निखिल जट्टलवार, वसीम कुरेशी, मिडिया प्रभारी आमीर शेख, कार्तिक नागपुरे, सुंदरसिंह बावरे, सुरज जुमनाके, ओम पारखी, विशाल नागपुरे, अमरसिंह बावरे, विजय आत्राम, लक्ष्मण देवगडे, शंकर गोचे, सुनील खोंडे, अनिल बोडाने व समस्त गावकरी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!