भद्रावती: गौराळा येथील संत गाडगेबाबा समाज मंदिर या ठिकाणी कर्मयोगी संत गाडगेबाबा प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने संत गाडगेबाबा यांचा ६७ वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ग्रामसफाई, घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर डेबुजी विचार वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये एकूण ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रांगोळी तसेच वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण सौ. पल्लवी अमोल ठाकरे, सौ.ज्योती भोस्कर यांनी केले; तर निबंध स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक अमोल वा. ठाकरे यांनी केले. “संत गाडगेबाबांचे कार्य हे समाजाला योग्य दिशा देणारे आहे. दीन-दुबळे अनाथ बांधवांना समजून घ्यावे, अडल्या- नडल्यांना मदत द्यावी. शिक्षणाशिवाय माणसाला पूर्णत्व येत नाही. अशा प्रकारचा जीवन घडविणारा मौलिक संदेश संत गाडगेबाबांनी जनतेला कीर्तनाच्या माध्यमातून दिला.” असे विचार परीक्षक सौ. पल्लवी ठाकरे यांनी मनोगतातून व्यक्त केले.
त्यानंतर प्रकाश पिंपळकर आणि संच साईप्रकाश म्युझिकल ग्रुपच्या वतीने धार्मिक भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. मा. पूजा कावरे यांच्या सुरेख आवाजात भक्तिमय गीताचा आस्वाद भाविक भक्तांनी घेतला. दुसऱ्या दिवशी कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृती भवन ते गवराळा परिसर परत स्मृती भवनापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये कार्यकारी मंडळासह श्रीराम महिला भजन मंडळ, रेणुका माता भजन मंडळ, सुहासिनी महिला भजन मंडळ आणि भाविक भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.यानंतर घेण्यात आलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मा. अनिलभाऊ धानोरकर , माजी नगराध्यक्ष, भद्रावती आणि प्रमुख पाहुणे म्हणून मा.पांडुरंग टोंगे , माजी सरपंच, रोशन पाल महाराज, मेश्राम महाराज, उपाध्यक्ष मा. किशोर भोस्कर, मासळ येथील मा. रमेश क्षीरसागर, मंडळाचे अध्यक्ष मधुकर क्षीरसागर , नीता आंबीलकर आणि मा.बंडू भोसकर, सचिव इत्यादी हजर होते.
मा.अनिल धानोरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून सामाजिक संघटनाचे महत्त्व समजावून सांगितले. ह.भ.प. सुवर्णाताई पिंपळकरनी थोडक्यात प्रवचन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसे संचालन प्राध्यापक अमोल वा. ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष, मा.संदीप चटपकर यांनी मानले. यानंतर ह.भ.प.रोशनपाल महाराजयांचे गोपाल काल्याचे किर्तन झाले. सदर पुण्यतिथी महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या संत डेबुजी महाराज विचार वक्तृत्व, निबंध तसेच रांगोळी स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना सौ.पल्लवी ठाकरे यांनी घोषित केलेले संतग्रंथ तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र स्वरूपातील बक्षीस आणि मंडळातर्फे रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेच्या परीक्षकांना सुद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत खुशी चतुरकर, क्रिश भोस्कर , तनुश्री क्षीरसागर , निबंध स्पर्धेत कृतिका भोस्कर आणि रांगोळी स्पर्धेत प्राप्ती कांबळे, कृतिका भोस्कर , मनीषा जाधव इत्यादींचा अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळासह अमित चिंचोलकर, रुपेश बारसागडे, कुणाल पत्रकार, निखिल बारसागडे, नचिकेत खूणकर, उज्वल किनकर, अजय क्षीरसागर, गुणवंत धाबेकर, राजू आंबीलकर, राहुल बारसागडे, प्रज्वल किनकर यासह आदींनी परिश्रम घेतले. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






