spot_img
spot_img
24.9 C
New York
Sunday, August 2, 2026

वडगाव ते धानोरा रस्त्याची दैनावस्था

रस्त्यातील पुलावर मोठे भगदाड, जर्जर अवस्थेत पूल

भद्रावती : तालुक्यातील वडगाव  ते धानोरा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पुलावर मोठे भगदाड पडले आहेत. पूर्ण पूल खाली गेला आहे, जर्जर अवस्थेत पूल आहे. मध्यभागी भगदाड पडले आहेत तिथे मुरुमाचा ढिगारा टाकून बांधकाम विभाग मोकळे झाले आहे. दोन्ही बाजूने चारचाकी वाहने जावू शकत नाही. बससेवा बंद झाली आहे. त्या पुलावर थोडा पाऊस आला तरी वाहतुक बंद होते. खड्ड्यात पाणी साचून नेहमी अपघात घडत आहेत. तरी देखील बांधकाम विभाग, आमदार, लोकप्रतिनिधी यांना नागरिकांच्या जिवाची पर्वा नाही. साधी बैलगाडी जाऊ शकत नाही. नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकाना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. खासगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. ऑटोरिक्षा ला लटकून विद्यार्थी प्रवास करत आहे. हा पूल धोकादायक आहे यावर काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाही. इतकी बेकार परिस्थिती होत पर्यंत प्रशासन झोपेत असते काय?

शिवसेना (उबाठा) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तथा वरोरा तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ बोरेकर यांच्ये नेतृत्वात सामाजिक कार्यकर्ते चंपतराव साळवे व अभिजित कुडे यांनी तात्काळ काम मार्गी लावावे अशी मागणी केली आहे. अन्यथा जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार असा इशारा दिला. नागरिकांनी त्या पुलावर मौन धारण करून बांधकाम विभागला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अभिजित कुडे, सामाजिक कार्यकर्ते चंपतराव साळवे, वामनराव चटप, रामदास तुरणकर, नामदेवराव पावडे, रामदासजी भोयर, समीर मडावी, वासुदेव गारघाटे, ऋषि चटप, अमोल गारघाटे, समीर आसूटकर, आशिष परचाके, सुमीत गारघाटे, नितेश गारघाटे, शुभाष तळवेकर, अमोल तळवेकर, पुरुषोत्तम गारघाटे, रूपेश आत्राम, अजित गारघाटे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!