वरोरा :- वरोरा तालुक्यात येत असलेल्या दादापूर, धानोली गट ग्रामपंचायतच्या हलगर्जी पनाचा फटका पुन्हा एकदा एन पावसाच्या दिवसात गावकऱ्यांना भोगावा लागत असुन ग्रामपंचायत ने केलेल्या चुकीच्या कामामुळे संपूर्ण दादापूर ग्रामवासियांच्या दूषित पिण्याच्या पाण्यामुळे आरोग्य प्रश्न निर्माण झाला आहे…
सविस्तर वृत्त या प्रमाणे की ग्रामपंचायत दादापूर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाबाहेरील एकच विहीर असून पावसाळ्यातील पाणी विहिरीत जात असल्यामुळे दूषित पाणी प्यावे लागत असल्यामुळे संपूर्ण नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, या ठिकाणी काही महिन्या आधी त्याच विहारी लगत ग्रामपंचायत ने गावकार्यांचा आरोग्याच्या कुठलाही विचार न करता बांधकामासाठी मोठं मोठे खड्डे उन्हाळ्यामध्ये खोदण्यात आले गावकऱ्यांनी याला विरोध केल्यानंतर हे खड्डे बुजवण्यात आले परंतु त्यात कुठल्याही प्रकारचे पक्के काम न केल्याने त्यात पावसाळ्याचे तसेच गावातील काही पाणी जमा होऊन तेच पाणी त्या खड्यांच्या साहाय्याने एकमेव असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहरीत जात असल्याने दादापूर ग्रामवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे
याबाबत गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतला पावसाळ्याचे पाणी विहिरीत जात असून पिण्याच्या पाणी खराब होत असल्याचे वारंवार सांगून सुद्धा ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावातील नागरिकाकडून करण्यात आलेला आहे,
ही सात सदस्य असलेले गट ग्रामपंचायत असल्याने सरपंच ही धानोली येथील आहे व त्यांना या बदल फोन द्वारे संपर्क केला असता त्या फोन उचलत नाही असा गावकार्यांचा आरोप आहे..
@ मी एक ग्रामपंचायत सदस्य असून मी सुद्धा सरपंच मॅडम यांना या बदल माहिति देण्या साठी फोन केला असता त्या माझा पण फोन उचलत नाही तसेच गावातील समस्याकडे लक्ष देत नाही :- दिलीप बोधाने ग्रामपंचायत सदस्य दादापूर
@ या बदल ग्रामपंचायत येथील शिपायला सांगितलं आहे व त्याना त्या पाण्यामध्ये पावडर टाकायला त्यांना सूचना केल्या आहे. सरपंच..विद्या खाडे गट ग्रामपंचायत दादापूर,धानोली






