भद्रावती : स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी योगाचे फायदे आणि त्याचा इतिहास याविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे योगाभ्यास म्हणजे भारताने जगाला दिलेली देणगीच आहे हे सुद्धा नमूद केलेया कार्यक्रमाला योग मार्गदर्शक म्हणून आकांक्षा आवारी यांनी उपस्थितांना विविध योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले त्याच पद्धतीने त्यांचे फायदे सुद्धा उत्तमरित्या विशद केले.

या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गजेंद्र बेदरे यांनी केले.सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक सुद्धा उपस्थित होते






