भद्रावती : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची महत्वाची बैठक भद्रावती तालुका स्तरावर डॉ .राहुल साळवे यांच्या हॉस्पिटलच्या अतिथी गृहात महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनात प्रमुख उपस्थित नुकतीच पार पडली. सदर बैठकीत मागील अहवाल वाचन करण्यात येऊन अंनिस वार्तापत्र मासिक व संघटन बांधणी विविध उपक्रम आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येऊन पुढील दोन वर्षाकरिता राज्य कार्यकारिणीच्या सूचनेनुसार भद्रावती तालुका शाखा पुनर्गठीत करण्यात आली.

यात मार्गदर्शक, सल्लागार रवींद्र तिराणीक, तालुकाध्यक्ष डॉ.राहुल साळवे, उपाध्यक्ष लताताई टिपले, कार्याध्यक्ष शारदाताई खोब्रागडे, प्रधान सचिव प्रा. अमोल ठाकरे, बुवाबाजी संघर्ष विभाग- नामदेव रामटेके, वार्तापत्र व प्रकाशन विभाग- श्रीधर भगत, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग -रवी वानखेडे, महिला विभाग -चंद्रकला गेडाम, विविध उपक्रम विभाग- चिंतामण आत्राम, जात निर्मूलन व विवेक जोडीदार निवड विभाग- भारत मडावी, मानसिक आरोग्य विभाग (संमोहन मार्गदर्शक)- प्रा. अनराज टिपले, मानसिक आरोग्य विभाग -सरिता मानकर, युवा व विवेक वाहिनी विभाग -राजरतन पेटकर, श्रीपाद बाकरे, सोशल मीडिया विभाग- सुरज शेंडे, प्रशिक्षण विभाग अशोक जवादे, कायदा विभाग महादेव कोल्हे, सांस्कृतिक विभाग अनिताताई भजभुजे, सदस्य सुरेखा रामटेके, अमोल करमरकर आधी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन कार्यकारणी घोषित करण्यात आली.






