ओबीसी संवाद यात्रा चंद्रपूर ला
०७ जून रोजी होणार मातोश्री सांस्कृतिक सभागृहात आगमन..
ओबीसी तेली समाज महासंघाच्या विद्यमाने संपूर्ण विदर्भात ओबीसी जागृती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ओबीसी संवाद यात्रेचे चंद्रपूर शहरात दिनांक ०७ जून २०२३ रोजी रोज बुधवारला सायंकाळी चार वाजता मातोश्री सांस्कृतिक सभागृह तुकुम रोड चंद्रपूर येथे आगमन होत आहे.
ओबीसी समाजात शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जागृती निर्माण व्हावी, त्यांचे हक्क त्यांना कळावे, सोबतच ओबीसी जनगणना व्हावी अशा प्रश्नांबद्दल जनजागृती करण्यासाठी ओबीसी संवाद यात्रा नागपूरवरून निघत आहे. ही ओबीसी संवाद यात्रा ही नागपूरातून निघून संपूर्ण विदर्भात फिरणार आहे. ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात जाणारा असुन ओबीसी समाजाला जागृत करण्याचे काम करणार आहे. ओबीसी संवाद यात्रेला श्री रघुनाथजी शेंडे विदर्भ अध्यक्ष, श्री डॉ. नामदेवराव हटवार सरचिटणीस, प्रा. रमेश पिसे संघटक, श्री कृष्णाजी बेले सहसंघटक, श्री उमाजी कोराम विद्यार्थी नेते, प्रा. सुधीर सुर्वे प्रसिद्धी प्रमुख, प्रा. सूर्यकांत खनके आयोजक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
ओबीसी जागृती संवाद यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक प्रा. सूर्यकांत खनके अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ जिल्हा चंद्रपूर यांनी केले आहे.






