सावित्रीबाई फुले विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळा द्वारे संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे एस.एस.सी. परीक्षेत विद्यालयातील प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचा सत्र २०२२-२३चा निकाल ८३.६२% लागलेला असून यात प्राविण्य प्राप्त ०३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत २२ विद्यार्थी, ५४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तृतीय श्रेणीत१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समरंभ आयोजित करण्यात आला.यामध्ये कुमारी पुष्पा राठोड , समीक्षा केळझरकर, मंगेश कांबळे, प्रियंका केळझरकर, गौरी भालेराव, पियुष भसारकर, बालेश्वरी कोरवते, अमित केळझरकर, इत्यादी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव नामदेवराव बोबडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे, पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक गुलाबराव राठोड, केशव भालेराव, रामचंद्र कोरवते , मडावी यांचे सह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजेश मांढरे यांनी केले प्रास्ताविक महेंद्रकुमार ताकसांडे तर आभार सुरेश पाटील यांनी मानले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता पुष्पगुच्छ व पेढा भरवून शुभेच्छा देण्यात आल्या.