spot_img
spot_img
23.4 C
New York
Saturday, June 6, 2026

ओम कडुकर चे सुयश….. विद्यार्थ्यांन पुढे आदर्श…

कुठल्याही ट्युशनला न जाता ९०.६० % गुण मिळविले.

नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला . यात अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन करून नैपुण्य प्राप्त केले. मात्र ओम धनराज कडुकर यांनी कोणतेही ट्युशन न लावता ९०.६० टक्के गुण घेत विद्यार्थ्यांपुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

विशेष म्हणजे ओम धनराज कडूकर हा सामान्य घरचा मुलगा आहे. याने कुठलाही कोचिंग क्लास न लावता स्वतः घरी अभ्यास करून ९०.६० टक्के गुण घेऊन विद्यार्थ्यांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सध्या अगदी पहिल्या वर्गापासून ट्युशन क्लास लावणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. असे समजून पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांमध्ये ट्युशन क्लासेस चे आकर्षण निर्माण करून ट्युशनला पाठवले जाते.

पण ओम धनराज कडूकर याने पहिली पासून दहावी पर्यंत कुठल्याही प्रकारचे ट्युशन क्लास लावलेले नव्हते. स्वतः दैनंदिन , नियमित अभ्यास केला व हे यश प्राप्त केले. आजच्या काळात कुठल्याही प्रकारची ट्युशन न लावता स्वतःच्या अभ्यासाच्या भरोशावर ९०.६० % गुण प्राप्त करून ओम कडुकर यांनी विद्यार्थ्यांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तो सेंट ऑनस हायस्कूल भद्रावती चा विद्यार्थी आहे. ओम कडुकर यानी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व शिक्षकांना दिलेले आहे. त्याच्या नैपुण्य प्राप्त यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!