उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये घेण्यात आली . बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक २५/०५/ २३ ला दुपारी दोन वाजता ऑनलाईन बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे असे बोर्डाने अधिकृत कळविले आहे.
विद्यार्थ्यांना महत्वाची असलेली एच एस सी २०२३ ची लेखी परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये घेण्यात आली. मधल्या काळात मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी संपात शिक्षक संघटना सहभागी झाल्याने उत्तर पत्रिका मूल्यांकनाचे काम काही दिवस थांबले होते . अशात निकाल उशिरा लागेल की काय? अशी शंका विद्यार्थ्यांनी, पालकांनी, अनेकांनी व्यक्त केली. पण शिक्षकांनी प्रामाणिकपणे मुल्यांकनाचे काम विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपले काम वेळीच पूर्ण केले. बहुप्रतीक्षित असलेला वर्ग बारावीचा निकाल उद्या दिनांक 25 5 2018 दुपारी दोन वाजता ऑनलाईन बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे, असे शिक्षण विभागाचे प्रमुख ओक यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना आपला निकाल उद्या २५/०५/२०२३ ला दुपारी दोन वाजता नंतर ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल.






