spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

चुडाराम बल्हारपुरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व कवी संमेलन … गडचिरोली येथे आयोजित

गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य व कला मंचाच्या वतीने झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी लिहिलेले व मधुश्री प्रकाशन पुणे ने प्रकाशित केलेले “गोंडवानाचा महायुद्धा क्रांतिवीर – बाबुराव शेडमाके ” या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण 28 मे 2023 ला गडचिरोली येथे होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन झाडीपट्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते गडचिरोली येथे संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य समीक्षक प्राचार्य डॉ. शाम मोहरकर राहणार असून प्राध्यापक डॉ. जनबंधू मेश्राम हे या पुस्तकावर भाष्य करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ. राजकुमार मुसणे हे नाट्यसमिक्षण करणार आहेत

चुडाराम बल्हारपुरे यांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रकाशन सोहळा व निमंत्रित कवींचे कवीसंमेलन सुद्धा आयोजित केलेले आहे. या प्रकाशन सोहळा प्रित्यर्थ विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्राध्यापक डॉ. पठाण , प्राध्यापक डॉ. प्रमोद मुनघाटे , प्राध्यापक डॉ धनराज खानोरकर , प्राध्यापक सदानंद बोरकर ( नाटककार), प्राध्यापक डॉ.नरेंद्र आरेकर, प्राध्यापक शेखर डोंगरे ,प्राध्यापक श्रीकांत कुत्तरमारे, अनिरुद्ध वनकर , नरेश मडावी , प्राध्यापक डॉ. माधव कांडणगिरे, प्राध्यापक योगराज नगराळे , प्राध्यापक डॉ. सविता सादमवार व प्रसिद्ध आदिवासी साहित्यिका कुसुमताई आलम हे याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी झाडेपट्टीतील संगीतकार विठ्ठल खानोरकर हे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके या नाटकातील नाट्य गीते सादर करणार आहेत.

या निमित्ताने झाडीपट्टीतील निवडक कवींचे कवी संमेलन घेण्यात येणार असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कवी सहभागी झालेले आहेत. या कार्यक्रमाला साहित्यिक व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यश्री साहित्य व कला चे पदाधिकारी यांनी केले आहे. चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांग्मय पुरस्कार प्राप्त झाले आहे . आज परू 12 पुस्तकांचे प्रकाशित झालेले आहे . दोन्ही दिवसा आधीच कंठेवाडी साहित्य संमेलनात गोंडवनचा महायोद्धा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके या नाटकास राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार मिळालेला आहे. या साहित्यिक कार्यक्रमाला साहित्य प्रेमी, कवी, रसिकांनी उपस्थित रहावे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!