spot_img
spot_img
22.3 C
New York
Thursday, July 30, 2026

राज्य परिवहन महामंडळ वरोरा आगार येथे विश्वासू प्रवासी संघटना समितीची स्थापना व कार्यकारिणी जाहीर

वरोरा: राज्य परिवहन आगार वरोरा येथे दि. १९.०५.२३ रोजी आगार व्यवस्थापक राज्य परिवहन वरोरा मनोज डोगरकर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण करणे व प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध देण्याकरिता व तसेच राज्य परिवहन महामंडळाला उपाययोजना सुचविण्याचा उद्देशाने विश्वासू प्रवासी संघटना समितीची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की बसस्थानक परिसरात प्रवाश्यांना पद्धतशीरपणे चढता उतरता यावे. यासाठी रांग पध्दतीची रचना करण्यात यावी, बस स्थानकावर साफसफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करावी, लांब पल्ल्याच्या गाड्या बस स्थानकावर आल्या पाहिजेत, बस स्थानकावर प्रवाश्यांना स्वच्छ व ठंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे, तसेच बस स्थानकावरील वाढत्या चोऱ्या लक्षात घेऊन तेथे दोन महिला व दोन पुरुष पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. प्रवासी संघटना समितीच्या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्याचे अध्यक्ष- ना. गो. थूटे जेष्ठ साहित्यिक तथा माजी मुख्याध्यापक कर्मवीर विद्यालय वरोरा, उपाध्यक्ष- दिपक घूडे मिडिया सल्लागार वरोरा, सचिव- डॉ. प्रशांत खुळे प्राचार्य लोकमान्य महाविद्यालय वरोरा, सहसचिव- ॲड. विनायक वानखेडे वरोरा, सदस्य म्हणून देवराव कांबळे सेवानिवृत्त अध्यापक, सादिक थैम ( पत्रकार) लोकमत समाचार, वरोरा तथा सामाजिक कार्यकर्ते, रमेश मेश्राम सामाजिक कार्यकर्ते, विजय गोटे सहकार भारती जिल्हाध्यक्ष तथा संचालक विदर्भ महिला क्रेडिट कॉ. सोसायटी, वरोरा. कीसन चौधरी माजी वाहतूक नियंत्रक वरोरा, प्रतिभा जूलमे (महिला सदस्य) समाजसेविका वरोरा, रेखा बंडू तेलतूंबडे समाजसेविका वरोरा यांची निवड करण्यात आली. या बैठकीचे आयोजन वरोरा आगार प्रमुख मनोज बाबा डोंगरकर व वर्षा इंगळे यांनी केले होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!