भरमसाठ पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पादन कोण विचारणार?
अपंग, विधवा, निराधार लोकांना उत्पन्न दाखल व ह्याती दाखल्याची सक्ती करु नये विनोद उमरे यांची मागणी भरमसाठ पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पादन कोण विचारणार? वरोरा: वयोवृद्ध, दिव्यांग व विधवा यांना स्वता हजर राहून उत्पन्न दाखले व ह्यातीचे दाखले सादर करण्याचे आदेश रद्द करण्यात यावे अशी मागणी अशी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे . श्रावण बाळ निराधार योजना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्याऱ्या वयोवृद्ध, दिव्यांग व विधवा यांना हयाति दाखले व उत्पादन दाखले तहसील कार्यलयात स्वता उपस्थित राहून घ्यायचे आहे .एकीकडे पेन्शन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पादन किती वाढले हे विचारत नसताना निराधारांना उत्पादन विचारणे हे चुकीचे आहे. तलाठी कार्यालय सेतू केंद्रात निराधारांना चकरा मारावे लागतात आहे. ज्यामुळे अतिवृध्द, दिव्यांग, असलेली ती निराधार व्यक्ती धास्तावले आहेत. हा प्रकार म्हणजे निराधार व्यक्तीना त्रासदायक असल्यामुळे त्यांना उत्पादन दाखला व हयातीचा दाखला स्वता उपस्थित राहून सादर करण्याची सक्ती करु नये, अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.वरोरा: वयोवृद्ध, दिव्यांग व विधवा यांना स्वता हजर राहून उत्पन्न दाखले व ह्यातीचे दाखले सादर करण्याचे आदेश रद्द करण्यात यावे अशी मागणी अशी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे .






