‘भारताचे संविधान व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अन्य योगदान’ : दिशादर्शक प्रश्नावली – भाग ४
झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावती चा स्तुत्य उपक्रम
भद्रावती :
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील योगदानासह त्यांच्या विविध क्षेत्रांतील कार्याचा अभ्यासपूर्ण परिचय करून देणाऱ्या ‘भारताचे संविधान व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अन्य योगदान’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाडीबोली साहित्य मंडळ, शाखा-भद्रावती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सु. वि. साठे लिखित हे पुस्तक दिशादर्शक प्रश्नावली – भाग ४ या स्वरूपात प्रकाशित होत आहे. हा प्रकाशन सोहळा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मारक, भद्रावती, जि. चंद्रपूर येथे होणार आहे.
झाडीबोली साहित्य मंडळ शाखा भद्रावतीच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा. प्रफुल्ली चटकी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सुधीरजी सातपुते, उपाध्यक्ष, न.प. भद्रावती यांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी झाडीबोली साहित्य मंडळ, शाखा-भद्रावतीचे अध्यक्ष प्रा. विवेकजी सरपदार, ‘स्मृतीगंध’ भद्रावतीचे संयोजक मा. प्रविणजी आडेकर, विदर्भ साहित्य संघ, शाखा-भद्रावतीचे सचिव प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार, ज्येष्ठ विचारवंत रमेशजी खातरखेडे, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा. विशालजी गावंडे, ग्रामगीताचार्य सौ. सोनालीताई अमोल गावंडे तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार सौ. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर यांची प्रमुख उपस्थिती विचारमंचावर राहणार आहे.
पुस्तकावर होणार अभ्यासपूर्ण भाष्य
पुस्तक प्रकाशनानंतर ज्येष्ठ साहित्यिक तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक मा. पांडुरंगजी कांबळे आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख मा. मधुकरजी वाटेकर हे या पुस्तकावर भाष्य करणार आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानविषयक विचारांसह त्यांच्या अन्य योगदानाचा विविध अंगांनी वेध घेण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. क्षितिज शिवरकर, अध्यक्ष, साईप्रकाश कला अकादमी, भद्रावती हे करणार असून, मा. अजय दर्वे, सदस्य, झाडीबोली साहित्य मंडळ, शाखा-भद्रावती हे आभार मानणार आहेत.
संविधान व आंबेडकरी विचारांच्या अभ्यासाला चालना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, भारतीय संविधानाची निर्मिती, सामाजिक परिवर्तनाची त्यांची भूमिका तसेच राष्ट्रनिर्माणासाठी त्यांनी केलेले विविधांगी कार्य यांचा चिकित्सक अभ्यास आजच्या पिढीसाठी महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर ‘भारताचे संविधान व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अन्य योगदान’ हे पुस्तक व त्यावरील चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
झाडीबोली साहित्य मंडळ भद्रावतीच्या माध्यमातून साहित्य, सामाजिक प्रबोधन आणि वैचारिक चळवळीला चालना देणाऱ्या उपक्रमांत या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची भर पडत आहे. साहित्यप्रेमी, संविधान अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या प्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक झाडीबोली साहित्य मंडळ, शाखा-भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.






