spot_img
spot_img
7.3 C
New York
Saturday, November 28, 2026

मराठी भाषा संवर्धन व विकास करणे सर्वांची जबाबदारी…प्रा. बाळासाहेब माने.

मराठी विषय शिक्षक महासंघ रायगडच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व काव्य मैफिल संपन्न.

पारगाव :

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, रायगड विभागाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व काव्य मैफिल कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या अनंत पांडूरंग भोईर विद्यालय व रघुनाथशेठ जितेकर ज्युनिअर कॉलेज दापोली-पारगाव येथे करण्यात आले. उत्साहपूर्ण आनंददायी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे संस्थापक सचिव प्रा. बाळासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर तथा दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सातारा, शाखा वाशी, नवी मुंबईचे चेअरमन प्रा. किशोर पाटील, संघटनेचे राज्य सल्लागार तथा उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या श्रीमती संजीवनी म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रायगड जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमधून एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्व जपण्याच्या व मराठी भाषा संस्कृतीची जोपासणा करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची व अभंगगाथा, दोस्ती पुस्तकाशी, आपला ऐतिहासिक रायगड, मनकल्लोळ, यश तुमच्या हातात अशी अनेक सुप्रसिद्ध पुस्तके व महासंघाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजिका कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय महासंघ रायगडच्या जिल्हाध्यक्षा प्रा. रेखा कटके यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश व महत्त्व विशद केले.

यावेळी प्रा. किशोर पाटील यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच मातृभाषेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात मराठी भाषेला असलेले महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी व समाजाने मातृभाषेच्या जतनासाठी योगदान द्यावे, असे सांगितले.

प्रा. संजय पाटील यांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधताना मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. संजीवनी म्हात्रे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध साहित्यिक उपक्रम व मराठी भाषा संमेलने आयोजित करण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी कृष्णा पाटील यांनी विविध देशांचे उदाहरण देत तेथील भाषा व संस्कृतीचे ज्या पद्धतीने संवर्धन केले जाते, त्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे आपणही आपल्या मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मराठी विषय महासंघच्या विविध कार्यक्रमांसाठी रु. पाच हजाराची देणगी दिली.

अध्यक्षीय भाषणात प्रा. बाळासाहेब माने यांनी, “मराठी ही आपली मातृभाषा, मायभाषा आणि मातृत्वाची भाषा आहे. त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपली आहे,” असे सांगितले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित प्राध्यापक व साहित्यिक रसिकांचे कवी संमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे श्रीवर्धन वरुन कार्याध्यक्ष प्रविण कुमार पाटील सर, महाड वरून प्राची हाटे, प्रा.गव्हाण प्रा. धनंजय भोसले प्रा. शिरसाठ, प्रा. पठाण प्रा. वडितके एस.एस. खिराडे मॅडम व इतर अनेक शिक्षक उपस्थित होते. व सर्वानीच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेळके कीर्तीदा व्ही के काॅलेज यांनी केले, तर महासंघाचे जिल्हा सचिव प्रा. प्राची हाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि काव्य मैफिलीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!