भद्रावती:
स्थानिक यशवंतराव शिंदे विद्यालय ( चिचोर्डी ) भद्रावती येथे शिक्षण घेत असलेला इयत्ता आठवीचा विद्यार्थी बालकुमार सर्वज्ञ पुरी याची मुलाखत आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून रविवार दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी रविवार ला सकाळी ८.४० मिनिटांनी बालसभा कार्यक्रमांमध्ये प्रसारित होत आहे.
हा बालकलाकार ग्रामीण भागातील पिरली या. भद्रावती या गावाचा रहिवासी असून त्याला राष्ट्रसंतांची खंजिरी वाजून कीर्तने, भजनी करणे विशेष आवडते. तसेच त्याला खेळामध्ये, कोणत्याही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणे आवडते. हा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असा आहे.
अशा या बालकलाकाराची मुलाखत बालसभा कार्यक्रमाच्या निवेदिका हेमा बहादे यांनी घेतली असून कार्यक्रमाचे सादर करते श्री उमेश दुपारे आहेत. तेव्हा या कार्यक्रमाचा आस्वाद सर्व श्रोते मंडळींनी घ्यावा असे आवाहन त्याचे मार्गदर्शक शालिक दानव, प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले आहे.






