संच मान्यतेच्या अन्यायकारक निकषाला विरोध
शिक्षकांचा कार्यभार संपवण्याचा डाव हाणुन पाडा
महासंघ व विज्युक्टाचा पुण्यात महामोर्चा
शिक्षण संचालकांसोबत सकारात्मक चर्चा संपन्न..
पुणे
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यता करताना शासनाने नवीन ऑनलाइन संचमान्यतेच्या अन्यायकारक निकषा विरुद्ध राज्यातील हजारो शिक्षकांनी महासंघ व विज्युक्टाच्या नेतृत्वात महामोर्चा काढुन शिक्षण आयुक्त कार्यालयाला घेराव घालतला. शिक्षण आयुक्तांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ व जुनिअर कॉलेज टीचर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या मोर्चा व आंदोलनाला शासनाने वेळेवर अनुमती नाकारली. मात्र शासनाविरोधात तीव्र असतोष असलेल्या शिक्षकांनी हा विरोध नाकारत आज आंदोलन यशस्वी केले.
कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता करताना संच मान्यतेचे नवीन घातक निकष लादून हजारो शिक्षकांचा कार्यभार संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप डाॅ.अविनाश बोर्डे यांनी मोर्च्याला संबोधित करतांना केले. शासनाचे शिक्षण व्यवस्था संपवण्याचे धोरण असल्याचा आरोप डाॅ. अशोक गव्हाणकर यांनी समारोपिय संबोधनात सांगितले. आज शुक्रवार दि. ४ सप्टेबर २०२६ ला पुणे येथे महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे , समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, कोष्याध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर, प्रा. लक्ष्मण रोडे, प्रा. संतोष फाजगे, प्रा. रवींद्र पाटील, प्रा.रविंद्र भदाणे, प्रा.दिलिप शितोडे, प्रा.विक्रम काळे आदींच्या नेतृत्वात हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचा महामोर्चा काढण्यात आला.
शिक्षण सहआयुक्त डॉ. श्रीराम पानझाडे यांनी मोर्चा मध्ये येऊन आंदोलनाचे निवेदन स्वीकारले व त्यानंतर शिक्षण संचालक महेश पालकर यांच्या समवेत चर्चा झाली. तुकडी टिकवण्याचे प्रचलित निकष कायम ठेवून प्रात्यक्षिकाची विद्यार्थी संख्या 20 विद्यार्थी, ४० मिनिटाची तासिका, मुलींची संख्या लक्षात घेवुन तुकडी टिकवणे, तुकडीसाठी किमान विद्यार्थी संख्या पूर्वीप्रमाणे कायम ठेवणे, ज्याव्दारे टप्प्यावर अवलंबून असलेल्या शाळा/ कमवि पुढिल टप्प्यावाढीसाठी त्यांना अडचण येणार नाही, इत्यादी महत्वपूर्ण मागण्या संदर्भात हे सर्व विषय कटाक्षाने लक्षात घेण्यासंदर्भात अनुकूल चर्चा झाली. याबाबत शासन पातळीवर हा विषय घेऊन धोरणात्मक निर्णयासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिक्षण आयुक्त मान्य केले.
या आंदोलनामध्ये प्रा. रमेश खाडे, प्रा. डी. एस. राठोड, प्रा. भाऊ गोरे, प्रा.भालचंद्र केंद्रे, प्रा. अनिल काळे, डाॅ. अभिजित पोटले, प्रा. संतोष कुटे, प्रा. संतोष अहिर, प्रा. रमेश जोल्हे, प्रा. संजय देवतळे, डाॅ. चेतन हिंगणीकर, डॉ. प्रवीण चटप, प्रा. प्रमोद उरकुडे, प्रा. विजय कुतरमारे, प्रा. प्रदिप शेवतकर, प्रा. गजानन धांडे, प्रा. विवेक देशमुख, प्रा. यशवंत पवार, डाॅ. शालीनी तेलरांधे, प्रा. वैशाली देशमुख, प्रा. संजय गोळे, प्रा. संजय लेनगुरे, प्रा. अरुण मेश्राम, प्रा. विलास पारखी, प्रा. रमेश नाकाडे, प्रा. प्रवीण वंजारी, प्रा.योगराज चौधरी, प्रा. मीनल कठाणे, प्रा. अभिजित डाखोरे, प्रा. जागेश्वर भेंडारकर इत्यादी राज्यातील अनेक पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी या आंदोलनात हजारोच्या संख्येने सहभागी झाले.






