spot_img
spot_img
7.3 C
New York
Saturday, November 28, 2026

पंचायत समिती भद्रावती येथील शिक्षण विभागात एआय प्रशिक्षण संपन्न…

भद्रावती

गट साधन केंद्र, पंचायत समिती भद्रावती येथे शिक्षकांच्या शैक्षणिक व तांत्रिक क्षमतावृद्धीच्या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) विषयक प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले.

शिक्षण विभाग पंचायत समिती भद्रावतीच्या तर्फे या प्रशिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना, शिक्षण क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमतेचा वापर, Generative AI, Prompt Engineering, AI च्या साहाय्याने पाठयोजना व शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रश्नपत्रिका व प्रश्नसंच तयार करणे, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी AI चा वापर, PPT व शैक्षणिक दृक्-साहित्य निर्मिती तसेच शिक्षकांच्या दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामांमध्ये Artificial intelligence (AI) चा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच AI चा वापर करताना माहितीची अचूकता पडताळणे, गोपनीयता व डेटा सुरक्षितता, कॉपीराइट आणि नैतिक वापर याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

प्रशिक्षणादरम्यान विविध AI साधनांचा प्रत्यक्ष वापर करून सहभागी शिक्षकांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. AI च्या माध्यमातून अध्यापन अधिक आकर्षक, परिणामकारक, विद्यार्थी-केंद्रित व तंत्रज्ञानस्नेही करण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षक यांनी व्यक्त केले. प्रशिक्षण उपयुक्त व मार्गदर्शक ठरले असून, प्राप्त ज्ञानाचा दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत प्रभावी वापर करण्याबाबत सहभागी शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला.

डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी यांनी एआय तंत्रज्ञानाची दैनंदिन गरज लक्षात घेता एआयचे प्रशिक्षण सर्व कर्मचाऱ्यांना मिळावे या हेतूने सदर प्रशिक्षण राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे प्रशिक्षणामुळे शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी व जबाबदार पद्धतीने वापर करण्यास मार्गदर्शन मिळाले.

सदर प्रशिक्षण पंचायत समिती भद्रावती येथील डॉ. प्रकाश महाकाळकर ( गटशिक्षणाधिकारी) यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडले. प्रशिक्षक कपिल राऊत संगणक निर्देशक यांनी सदर प्रशिक्षण दिले. या प्रसंगी श्रीमती स्वाती महाजन, विस्तार अधिकारी (शिक्षण), सर्व केंद्र प्रमुख, सर्व विषय तज्ञ, सर्व विषय शिक्षक व शिक्षण विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!