spot_img
spot_img
23.2 C
New York
Wednesday, August 12, 2026

रोटरी क्लब भद्रावतीच्या पुढाकारातून ‘ज्ञानातून जनजागृतीकडे’; प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…….

भद्रावतीच्या ज्ञानकन्येची कोल्हापूरकडे भरारी !

मनश्री शेगमवार प्रथम;… राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

भद्रावती

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याबरोबरच एचआयव्ही/एड्स, गुप्तरोग आणि सामाजिक जनजागृतीविषयी अचूक ज्ञान पोहोचविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब, भद्रावतीच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुबंई , जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आणि एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, ग्रामीण रुग्णालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, भद्रावती येथे जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावतीच्या प्राचार्या गावंडे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.

रोटरी क्लब भद्रावतीने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाचे प्रभावी नियोजन केले. विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धेच्या माध्यमातून ज्ञान मिळावे एवढाच उद्देश न ठेवता, एचआयव्ही/एड्सविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि युवकांनी समाजजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता.


या स्पर्धेसाठी भद्रावती तालुक्यातील विविध शाळांमधून ५५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या स्पर्धेत कु. मनश्री सुरेश शेगमवार हिने प्रथम क्रमांक, कु. आभा प्रफुल वाळके हिने द्वितीय क्रमांक, तर कु. समृद्धी मनोज रामटेके हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थिनींचा व प्रोत्साहन पर तन्मय गंडाईत या विद्यार्थ्यांचा ही रोटरी क्लब भद्रावतीच्या वतीने सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

स्पर्धेतील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. मनश्री सुरेश शेगमवार हिची राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ती चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या प्रवास, निवास व इतर आवश्यक खर्चाची व्यवस्था महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मनश्रीच्या या यशाबद्दल रोटरी क्लब भद्रावतीच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून कोल्हापूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रोटरी क्लब भद्रावतीचे अध्यक्ष सुधीर पारधी, सचिव सुरेंद्र राऊत, प्रकल्प सचिव प्रकाश पिंपळकर, कोषाध्यक्ष महेंद्र गावंडे, प्रकल्प प्रमुख प्रा. डॉ ज्ञानेश हटवार व प्रा. संजय बोरकुटे यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष पुढाकार घेतला. यावेळी जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर, रोटरी क्लब भद्रावतीचे अध्यक्ष सुधीर पारधी व समुपदेशक शीतल भडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एचआयव्ही /एड्सविषयीची अचूक माहिती आत्मसात करून समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास निरंजन मंगरूळकर,अनिलभाऊ धानोरकर, डॉ. माला प्रेमचंद, सुनील पोटदुखे, प्रवीण महाजन, विक्रांत बिसेन, किशोर खंडाळकर, आनंद क्षीरसागर, मनोहर नागपुरे, किशोर भोस्कर समुपदेशक शीतल भडके, तेजश्री दुर्योधन, रोशन आकुलवार, अनिता वाघमारे व आकाश रायपुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन आकुलवार यांनी केले.


रोटरी क्लब भद्रावतीच्या सामाजिक बांधिलकीच्या विविध उपक्रमांमध्ये आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व जनजागृतीला सातत्याने प्राधान्य दिले जात असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा ज्ञानवर्धक उपक्रमांचे आयोजन यापुढेही करण्यात येईल, असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब, भद्रावतीचे पदाधिकारी व सदस्य, एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, भद्रावती तसेच संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, चंद्रपूर यांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!