spot_img
spot_img
24.8 C
New York
Wednesday, August 12, 2026

डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय, भद्रावती येथे ‘हर घर तिरंगा रॅली’ यशस्वीपणे संपन्न…..

भद्रावती

डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय, भद्रावती यांच्या एन.सी.सी. विभागाद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने “हर घर तिरंगा रॅली”चे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्य संपूर्ण देशभरात घरघर तिरंगा हा अभियान राबविण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर भद्रावती येथील डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयातील एनसीसी विभागामार्फत भद्रावती शहरात घरघर तिरंगा अभियान जागृती रॅली काढण्यात आली. या रॅली देशभक्तीपर घोषणा देऊन वातावरण निर्मिती करण्यात आली. घरघर तिरंगा या उपक्रमात राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा यासंबंधीची जाणीव जागृती करण्यात आली.

ही रॅली 21 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी., वर्धा यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आली होती. डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय, भद्रावती च्या एन.सी.सी. कॅडेट्सनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सर्व कॅडेट्स हातात राष्ट्रीय ध्वज घेऊन एकता आणि देशभक्तीच्या घोषणा देत चालत होते.

रॅली महाविद्यालयाच्या परिसरातून सुरू होऊन भद्रावतीच्या मुख्य मार्गांनी गेली. यावेळी “हर घर तिरंगा” चा संदेश देण्यात आला. भद्रावती येथील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा या रॅलीचे उस्फुर्त स्वागत केले. कार्यक्रमासाठी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे उपस्थित होते. त्यांनी कॅडेट्सच्या शिस्त आणि समर्पणाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.

हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता, तिरंग्याबद्दलचा आदर आणि भारतीय असल्याचा अभिमान यांचा संदेश देण्यात यशस्वी ठरला. यावेळी प्राचार्य प्रमोद पाठक डॉ. प्रशांत पाठक, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. कपिल राऊत, प्रा. नेहा मानकर, प्रा.दीपमाला लोखंडे ,सीमा हवेलिकर, पूनम काळे आणि नेहा सुरतीकर हे देखील रॅलीमध्ये उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!