सायबर सिक्युरिटी व पोस्को कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न…
भद्रावती
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे किशोरवयीन मुला मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन, सायबर सिक्युरिटी व पोस्को कायदा विषयक तरतुदी या संदर्भात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून पीएसआय पठाण साहेब व महिला हेडकान्स्टेबल सुकेशिनी मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे महिला तक्रार निवारण, सुरक्षा समिती मार्फत आयोजित महिला सुरक्षा, सायबर सिक्युरिटी विषयक मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर मोते, प्रमुख अतिथी पीएसआय पठाण साहेब, महिला हेड कॉन्स्टेबल सुकेशिनी मॅडम, कॉन्स्टेबल प्रशांत सेंद्रे, व दामिनी पथकातील महिला शिपाई, प्रा. उज्वला वानखेडे, प्रा. डॉ. किरण पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात तक्रार पेटी लावलेली आहे. त्यात आपल्याबद्दलच्या तक्रारी टाकूनही पेटीचा वापर आपण करावा. आपल्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारी निश्चितच सोडवल्या जातील असा विश्वास व्यक्त केला. किशोरवयीन मुला मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन करताना महिला हेडकान्स्टेबल सुकेशिनी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी, महिला विषयक कायदे, पोस्को कायदा २०१२ अंतर्गत कायदेशीर तरतुदी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी समाजात वावरताना सजग राहून आपल्याबद्दल काही अघटीत घटना घडल्यास पालकांना, शिक्षकांना, तसेच पोलिसांना कळवावे, पोलीस आपले मित्र आहेत, असे मार्गदर्शन केले.
पीएसआय पाटील साहेब यांनी मोटार वाहन कायदेविषयक मार्गदर्शन यावर विद्यार्थ्यांना गाडी चालवताना घ्यावयाची दक्षता, बिना लायसन गाडी चालवणे हा गुन्हा आहे, यावर मार्गदर्शन केले. प्रशांत सेंद्रे सर यांनी क्राईम विषयक मार्गदर्शन करताना आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे. आपण घराबाहेर पडताना घ्यावयाची दक्षता, आपल्या मौल्यवान वस्तूंची आपण व्यवस्था कशी करावी, याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उज्वला वानखेडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रणिता बोकडे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






