spot_img
spot_img
30.2 C
New York
Friday, June 5, 2026

उज्वल भविष्यासाठी राष्ट्रहित जोपासा…. डॉ जयंत वानखेडे

डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात निरोप समारंभ..

भद्रावती.

डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय भद्रावती येथील बी. ए. प्रशासकीय अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमात अध्यक्ष मार्गदर्शन करतना डॉ. जयंत वानखेडे विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व भद्रावती शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ. जयंत वानखेडे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक असणाऱ्या विषयांवर मार्गदर्शन केले. इंग्रजी विषयाचे महत्त्व, शिक्षणाची आवड, विद्यार्थांचे करिअरविषयक स्वप्न, आत्मविश्वास जोपासण्याची कला व आवडत्या क्षेत्रात कार्यरत असण्याची भूमिका इत्यादी विषयी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत पाठक यांनी प्रशासकीय महाविद्यालयाची पायाभरणी कशाप्रकारे झाली आणि हा विस्तारलेला वटवृक्ष विद्यार्थी घडविण्याच्या वाटचालीकडे कसा प्रयत्नरत आहे, याबाबत मत व्यक्त करीत असताना विद्यार्थ्याने अभ्यासाचे महत्त्व समजून घेण्याची आवश्यकता असल्याची भूमिका आपल्या मार्गदर्शनातून मांडली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक (कार्यक्रमाध्यक्ष) यांनी विद्यार्थांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून प्रा. प्रीती कंदीकट्टीवार यांनी निरोप समारंभ कार्यक्रमामागील भूमिका सांगून विद्यार्थी जीवनाची रुपरेषा मांडली.

कार्यक्रमाप्रसंगी अंतिम वर्षाच्या विद्यार्थांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करत भावनिक झाले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थांनी अनेक कला, नृत्य, संगीत, फॅशन शो चे प्रदर्शन करीत आनंद व्यक्त केला. याप्रसंगी प्रा. प्रज्ञा बुरडकर (सांस्कृतिक कार्यक्रमाधिकारी), प्रा. नेहा मानकर(NSS कार्यक्रमाधिकारी), प्रा. विशाल प्रसाद (NCC कार्यक्रमाधिकारी) प्रा. कपिल राऊत व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरव प्रसाद व अभिजीत सेन या विद्यार्थांनी केले तर कु. आचल उईके हिने कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!