डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती उत्साहात संपन्न…
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती, डॉ विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय, भद्रावती, मातोश्री नीलिमाताई शिंदे महिला महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती महाविद्यालयाच्या सभागृह उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
भारतरत्न, महामानव, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्रमुख मार्गदर्शक नागसेन पाझारे भद्रावती, प्रमुख अतिथी डॉ. जयंत वानखेडे, विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्राचार्य डॉ सुधीर मोते व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीमेचे पुजन व माल्यार्पन, त्रिशरण पंचशील म्हणून करण्यात आली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा. डॉ कार्तिक शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. भारतीय राज्यघटना ही सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय सुचवणारी सर्वात मोठे लिखित दस्तऐवज असल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते नागसेन पाझारे यांनी मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी व कामगारांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी डॉ जयंत वानखेडे यांनी मार्गदर्शन केले, तसेच प्रा. उज्वला वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






