spot_img
spot_img
8 C
New York
Thursday, March 26, 2026

मांगली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

आरोग्य तपासणी शिबिर व आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन; विविध शासकीय लाभांचे वितरण करण्यात आले

भद्रावती, दि. १४ : भद्रावती तालुक्यातील मौजा मांगली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला तसेच आरोग्य तपासणी शिबिर आणि शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.

शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवांअंतर्गत नागरिकांना तात्काळ लाभ देण्यावर भर देण्यात आला. या अंतर्गत अद्ययावत ७/१२ उतारे-१०५, रेशन कार्ड दुरुस्ती व नवीन कार्ड -३२, आयुष्मान भारत कार्ड -१५, भूमी अभिलेख सनद वाटप-९८, तसेच राजपत्रानुसार आदेश- ०१ असे विविध लाभ नागरिकांना वितरित करण्यात आले.

याशिवाय कृषी विभाग, महिला व बालविकास विभाग, पंचायत समिती, डिजिटल साक्षरता अभियान तसेच इतर विभागांमार्फतही विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांना लाभांचे वितरण करण्यात आले.

या शिबिराला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अतुल जटाले, तहसीलदार राजेश भांडारकर, खंड विकास अधिकारी बंडू आकुनवार, उपअधीक्षक भूमी अभिलेख कृष्णा पारधी, बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम, पशुधन विकास अधिकारी डॉ. बेनिया, दुय्यम निबंधक झाडे, मंडळ अधिकारी अनिल दडमल, ग्राम महसूल अधिकारी राजुरकर, तुराळे व राहुल भोंगळे उपस्थित होते.यावेळी आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी वर्ग, नागरिक तसेच परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या महसूल समाधान शिबिरामुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयीन फेऱ्या माराव्या न लागता गावातच विविध सेवांचा लाभ मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!