spot_img
spot_img
8 C
New York
Thursday, March 26, 2026

घरगुती वापराच्या सिलेंडरचा व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात वापर..

तालुक्यातील हॉटेल,चायटपरी व्यावसायिक यांचे कडून घरगुती सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर…

एकीकडे युद्धामुळे भारतामध्ये आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून आधीच तालुक्यातील ग्रामीण भागात 45 दिवसाच्या आत घरगुती सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे.
तालुक्यातील परिसरातील नागरिकांना गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर करीता ग्राहकांना चकरा माराव्या लागत आहे तर दुसरीकडे तालुक्यातील वरोरा, बोर्डा,सोईट, टेमुरडा, माढेळी,खांबाळा,शेगाव येथील काही हॉटेल व्यावसायिक तसेच चायटपरी व्यावसायिक यांच्याकडून घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात दुकानावर अवैध वापर सुरू आहे. विशेषता मुख्य महामार्गावर असलेले हे हॉटेल व्यावसायिक यांच्यावर कारवाई मात्र शून्य दिसून येत आहे.
कुटुंबातील घरामध्ये वापरणाऱ्या गँस हा 14 kg असुन हॉटेल व्यवसायासाठी निळ्या रंगाचा 19 kg गॅस सिलेंडर वापरणे शासनाच्या नियमानुसार बंधनकारक आहे, एकीकडे तहसीलचे भरारी पथक नेमण्यात आली असून वरोरा तालुक्यातील मोठ्या गावामध्ये अशाप्रकारे भर दिवसामुख्य हायवेवर सिलेंडरचा काळा बाजार होत असेल तर भरारी पथकाच्या होणाऱ्या कारवाईवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे..

या संदर्भात वरोरा तालुक्याचे पुरवठा नियंत्रण अधिकारी गवई यांच्याशी फोनद्वारे विचारणा केली असता सध्या कुठेही गॅस च्या तुटवडा नसून ग्रामीण भागातील जनता सुरू असलेल्या युद्धामुळे मोबाईल इंटरनेटवर पसरवण्यात येणाऱ्या अफवांना बळी पडून गॅस एजन्सी मध्ये गर्दी करत आहेत तसेच ग्रामीण भागातील अनेक सिलेंडर धारकांनी केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांना मोबाईल ओटीपी जात नसल्यामुळे गँस ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळण्यास विलंब होत आहे तरी आम्ही,आमची टीम गॅस एजन्सीतीलसाठा चौकशी करून अवैध गॅस धारकावर कारवाई करू अशी माहिती गवई यांनी दिली.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!