spot_img
spot_img
30.2 C
New York
Friday, June 5, 2026

बल्लारपूर येथे प्रभू विश्वकर्मा जयंती तथा लोहार समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर

लोहार व तत्सम जाती बहुउद्देशीय विकास सामाजिक संघटन तालुका शाखा बल्लारपूर तथा श्री विश्वकर्मा लोहार समाज संघटना बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांचे वतीने तालुका स्तरीय श्री प्रभू विश्वकर्मा जयंती तथा सामाजिक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन दिनांक १५ मार्च २०२६ रविवारला सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सार्वजनिक हनुमान मंदिर विवेकानंद वार्ड बल्लारपूर येथे करण्यात आले असून, या मेळाव्याचे उद्घाटन मान. सौ. अल्काताई अनिलजी वाढई नगराध्यक्षा नगरपरिषद बल्लारपूर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. श्री. माधवराव पडघम साहेब ज्येष्ठ सामाजिक विचारवंत तथा माजी उपाध्यक्ष वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर हे उपस्थित राहणार आहे.


कार्यक्रमाला विशेष प्रमुख पाहुणे म्हणून मान. श्री. अर्जुन मनाबाई गुंजाऱ्या पावरा साहेब उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, मान. श्री विपिन इंगळे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारपूर, मान. श्री. धनंजय साळवे साहेब जिल्हा समाज कल्याण अधिकारी चंद्रपूर, मान. सौ जयश्रीताई किशोर मोहुर्ले माजी शिक्षण सभापती नगरपालिका बल्लारपूर, मान. शिल्पाजी तुळशीराम चुटे उपसभापती महिला व बालकल्याण विभाग नगरपरिषद बल्लारपूर, मान. श्री अरुणजी वाघमारे माजी नगरसेवक नगर परिषद बल्लारपूर, मान. श्री जितेशजी मेश्राम मुख्य प्रबोधनकार तथा सचिव वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर, मान. श्री गुरुदेव बावणे अध्यक्ष प्रभू विश्वकर्मा लोहार शिक्षण संस्था चंद्रपूर , मान. किशोर बावणे सचिव प्रभू विश्वकर्मा शिक्षण संस्था चंद्रपूर, मान. श्री आनंदजी बावणे अध्यक्ष लोहकांत फॉर्मर प्रॉडक्ट कंपनी लि. चंद्रपूर तसेच बल्लारपूर शहरातील सामाजिक, राजकीय कार्यात अग्रेसर विशेष प्रमुख पाहुणे मंडळी उपस्थित राहणार आहे.


सकाळी १०:०० वाजता प्रभू विश्वकर्मा पालखी शोभायात्रेने सुरुवात होणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील व शहरातील सर्व लोहार समाज बांधवांच्या सहकार्याने संपन्न होणाऱ्या आयोजना मध्ये विविध विषयावर मार्गदर्शन होणार आहे लोहार समाज एकता, वैचारिक अभाव व त्याचे दुष्परिणाम व उपाय तसेच लोहार व तत्सम जाती समाजाची शैक्षणिक सामाजिक आर्थिक सद्यस्थिती दशा दिशा व उपाय यावर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार असून लोहार समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा बल्लारपूर तालुका व बल्लारपूर शहर लोहार समाज संघटन तर्फे सत्कार करण्यात येत असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा यावेळी आयोजित केलेला आहे.


सामाजिक बांधिलकी जपत वधू वर परिचय मेळाव्याला लोहार समाजातील वधू वर व पालक वर्गांनी अवश्य यावे ही विनंती. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून समाजातील विद्यार्थी, कलावंत यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य आयोजनात समस्त लोहार समाज बांधवांनी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहण्याची आव्हान बल्लारपूर तालुका लोहार समाज संघटन तथा श्री विश्वकर्मा लोहार समाज संघटना बल्लारपूर यांचे वतीने आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे. यासाठी सर्व बल्लारपूर तालुक्यातील शहरातील लोहार समाज एकजुटीने कार्य करत असून त्यांच्या या समाजिक कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती संपूर्ण पदाधिकारी व कार्यकारी मंडळ यांचे वतीने करण्यात येत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!