३० वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेत संपवले जीवन
शेगाव बु येथील हनुमान वार्ड येथील माता मंदिर मागील एका छोट्या विहिरीमध्ये काल सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान शेगाव मधील पिंटेश रामाजी दडमल वय ३० वर्ष रा. हनुमान वार्ड याने दारूच्या नशेत विहिरीमध्ये उडी घेऊन जीवन यात्रा संपवली. प्राप्त माहितीनुसार पिंटेश हा नेहमी दारूच्या नशेत राहत असून तरुणाच्या परिवार तसेच मृत तरुण हा मजुरीचे काम करायचे नेहमी दारू पिण्याच्या सवयीमुळे घरामध्ये किरकोळ वाद होत असत.

घटनेच्या दिवशी सुद्धा मृत तरुण हा दारूच्या नशेत असून घरामध्ये किरकोळ वाद करून सरळ विहिरीकडे धावत सुटला व कुठलाही विचार न करता शेगाव येथील हनुमान वार्ड मधील माता मंदिरच्या मागील एका छोट्याशा विहिरीमध्ये उडी टाकून जीवन यात्रा संपवली अशी माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली आहे.
त्यानंतर याची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली शेगाव पोलीस यांनी गावातील काही तरुणांच्या मदतीने सदर तरुणाचा मृतदेह बाहेर काढला असून पंचनामा करून उत्तर ये तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आलेला आहे. घटनेचा पुढील तपास शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पौले व शेगाव पोलीस करीत आहे..






