भद्रावती, दि. ०८ : महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्रमांक १ ची सुरुवात दि. ७ मार्च २०२६ रोजी भद्रावती तालुक्यातील मौजा नंदोरी येथे अतुल जटाले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संदीप मस्के, उपविभागीय अधिकारी आणि राजेश भांडारकर, तहसिलदार भद्रावती यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

अभियानामध्ये अद्यावत ७/१२ वितरण, वर्ग २ चे १ आदेश, आधार कार्ड अद्यावत करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजना मंजुरी आदेश, रेशन कार्ड दुरुस्ती तथा नवीन कार्ड बनविणे, आयुष्यमान भारत कार्डाचे वाटप, एग्रिस्टॅक योजना तसेच डोमेशियल, इनकम आणि कास्ट सर्टिफिकेट प्रमाणपत्राचे वितरण, कृषी, महिला व बालविकास आणि विविध लाभाचे वितरण पंचायत समिती मार्फत करण्यात आले.

या कार्यक्रमाला तहसिलदार राजेश भांडारकर, खंड विकास अधिकारी, डॉ. बंडू अकनूरवार, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. संजय आसूटकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग,पारधी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पूनम गेडाम, गट शिक्षणाधिकारी प्रकाश महाकालकर, सहाय्यक निबंधक झाडे, डॉ. ताजणे, पशुधन विकास अधिकारी, नंदोरी ग्रामपंचायतीचे प्रशासक, मंगेश भोयर व नरेंद्र जीवतोडे, ग्रामपंचायत सदस्य, नंदोरी परिसरातील नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






