झाडीबोली साहित्य मंडळ व विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली अर्पण…
भद्रावती
झाडीबोली साहित्य मंडळ व विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती यांच्या संयुक्त विद्यामाने ज्येष्ठ साहित्यिक स्व. आचार्य ना गो थुटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक भद्रावती येथे अनेक साहित्यिक मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक कवी आचार्य ना. गॊ. थुटे सर यांचे वृद्धापकाळाने वरोरा येथे २ मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांना झाडीबोली साहित्य मंडळ व विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती च्या वतीने हुतात्मा स्मारक भद्रावती येथे होणाऱ्या एकवार साहित्याचा या नियमित कार्यक्रमात दि. ६/३/२०२६ ला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळ शाखा भद्रावतीचे अध्यक्ष प्रा. विवेकजी सरपटवार, वि. सा. संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, सु. वी. साठे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
श्रद्धांजली अर्पण करताना अनेक उपस्थित कवींनी स्व आचार्य ना गो थुटे सरांच्या स्मृतींना उजाळा दिला, व आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये डॉ ज्ञानेश हटवार यांनी आचार्य ना गो थुटे सरांनी आपणा सर्व साहित्यिकांना प्रेरणा दिलेली आहे. त्यांचा साहित्यिक वारसा आपण सर्वांनी पुढे न्यावयाचा आहे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मनोगत व्यक्त केले. सु वी साठे सरांनी अनेक आठवणींना उजाळा दिला व विलोभनीय व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला.
श्री वाटेकर सर, बालकवी मयंक दरवे, श्री घुमे सर, श्री रमेश भोयर , श्री, अजय दर्वे, श्री पवार, श्री सिंग साहेब, शाहू म्याॅडम, श्री शेंडे, तसेच इतरही साहित्यिक, नागरिक मंडळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितिज शिवरकर यांनी केले.






