spot_img
spot_img
30.2 C
New York
Saturday, June 6, 2026

विदर्भ साहित्य संघ नागपूर ची निवडणूक रंगतदार होणार…

नागपूर

साहित्य प्रांतात प्रथित यश असलेली विदर्भ साहित्य संघ नागपूरची निवडणूक जाहीर झाली आहे. यात २०२६- ३१ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेशी व चुरशीची होण्याची शक्यता आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या यशस्वी परंपरेला १०३ वर्षे पूर्ण झाले आहेत. साहित्य क्षेत्रात नावलौकिकास प्राप्त आलेली ही संस्था यावर्षी बऱ्याच कालावधीनंतर निवडणुकीला सामोरे जात आहे. यात अध्यक्ष पदासाठी व सदस्य पदासाठी अनेक जण आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेक दिग्गज मातब्बर साहित्यिकांचे लक्ष लागलेले आहे. वि सा संघाच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत जुने कार्यकारी पदाधिकारी ही निवडणूक लढवत आहेतच पण त्यासोबतच अनेकांनी या निवडणुकीत उडी घेतल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे बोलले जाते.

सध्या वि सा संघाचे अध्यक्ष असलेले प्रदीप दाते हे अध्यक्ष पदासाठी उभे आहेत. त्यांच्या विरोधात जवळपास ५ उमेदवार हे अध्यक्ष पदासाठी या निवडणुक रिंगणात उभे आहेत. २२ सदस्यांच्या निवडणुकीसाठी जवळपास ८५ उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे.

वि. सा. संघाचे विद्यमान अध्यक्ष असलेले प्रदीप दाते हे अध्यक्षपदासाठी उभे असून त्यांच्या अक्षर मैत्री पॅनल मध्ये सदस्य म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ श्याम मोहरकर, विलास मानेकर, डॉ राजेंद्र दोडके, संपादक श्रीपाद अपराजित, डॉ सतीश तराळ, विवेक अलोणी, डॉ अजय देशपांडे, डॉ गणेश चव्हाण, डॉ राजेंद्र मुंढे , डॉ दिलीप अलोणे, प्रमोदकुमार अणेराव, संजय इंदुरकर, सुभाष किन्होळकर, डॉ. मोना चीमोटे, श्रीमती वृषाली देशपांडे, श्रीमती आभा मेघे, श्रीमती संयोगिता धनवटे, प्रफुल शिलेदार, अनिल गडेकर, सुनील शिनखेडे, नरेश सब्जीवाले हे या निवडणुकीत उभे आहेत.

वि सा संघाच्या या निवडणुकीत आजीव सभासद हे मतदार असून, ते कोणाच्या पारड्यात मतदान देतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते यांनी वि सा संघाच्या यशस्वी वाटचालीसाठी व विकासासाठी आमच्याच अक्षर मैत्री पॅनलला निवडून द्या. ही राजकीय निवडणूक नाही असे एका प्रसिद्धी पत्रकात प्रदीप दाते यांनी मतदारांना आवाहन केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!