spot_img
spot_img
30.2 C
New York
Friday, June 5, 2026

मराठीचे मुख्य नियामक प्रा पवन कटरे यांचा सत्कार….

डाॅ. शिवलिंग पटवे यांचे समस्या सोडवीण्याचे आश्वासन….

नागपूर

नागपूर विभागीय शिक्षण मंडळ नागपूरची मराठी विषयाची समीक्षकांची सभा आज संपन्न झाली. या सभेचे अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ नागपूरचे अध्यक्ष डॉ शिवलिंग पटवे, मुख्य नियामक प्रा. पवन कटरे , बोर्डाच्या शेंडे मॅडम , श्रीरामे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

या वेळी मराठी विषयाचे नागपूर विभागाचे मुख्य नियामक प्रा. पवनजी कटरे सर यांचा सत्कार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, प्रा. किशोर वरभे, प्रा. डॉ माया रंभाळे मॅडम, डॉ शालिनी तेलरांधे मॅडम, उपाध्यक्ष नागपूर, डॉ मेघा राऊत मॅडम यांनी केले. मराठी विषयाचे मुख्य समीक्षक प्रा. पवन कटरे यांचा सत्कार मराठी विषय शिक्षक महासंघाच्या चंद्रपूर , गडचिरली, गोंदिया, भंडारा, वर्धा व नागपूर जिल्ह्याच्या वतीने स्वतंत्रपणे करण्यात आला. यावेळी मराठी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी लिहिलेली “ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व” हे पुस्तक नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे साहेब यांना त्यांनी स्वतः भेट दिली.

समीक्षकांच्या सभेत मार्गदर्शन करताना डॉ शिवलिंग पटवे साहेब यांनी मराठी भाषेच्या समृद्धतेसाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहात याचे कौतुक केले. आपण आपल्या विद्यार्थ्यांना प्रमाण भाषेच्या वापरासाठी आग्रही असले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. आपण मराठी महासंघाच्या वतीने अनेक उपक्रम राबवित असता. यापुढे आपण मराठी विषयासाठी संयुक्तपणे नाविण्यपूर्ण उपक्रम राबवूयात असेही सांगितले. यावेळी मराठी विषयाचे मुख्य नियामक प्रा पवन कटरे सर यांनी समीक्षकांनी समीक्षणाचे कार्य करताना घ्यावयाची दक्षता व परीक्षकांना द्यावयाच्या सुचना याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. किशोर वरभे यांनी महासंघाचे वतीने काही मागण्या विभागीय अध्यक्षांपुढे मांडल्या. त्यांची दखल घेवून डॉ. पटवे साहेब यांनी त्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रा. महेश गेडाम सर यांनी पेपर तपासताना विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शालीनी तेलरांधे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ माया रंभाळे यांनी केले. कार्यक्रमाला विभागातील सर्व जिल्ह्यातील १०० च्या वर समीक्षक हजर होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!