भंडारा जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी यांची सभा दिनांक १३/५/२०२३ रोज शनिवारला ठीक : १२- ०० वाजता, विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी, जि. भंडारा. येथे संपन्न झाली. ग्रंथालय चळवळीचे नेते श्री राजूभाऊ मासुरकर यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी यांचे उपस्थितीत, मा. श्री राजकुमारजी हटवार यांचे अध्यक्षतेखाली विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषदेची चौथी बैठक आज घेण्यात आली. विदर्भ ग्रंथालय परिषदेचे आयोजन करण्यासंबंधाने सविस्तर चर्चा करण्यात आली. परिषदेच्या आयोजनासाठी कार्यकारिणी मागील सभेत गठित करण्यात आली. यात अध्यक्ष – श्री रमेश गोमासे, उपाध्यक्ष – श्री अशोक हुमने, संयोजक – श्री राजूभाऊ मासूरकर, सचिव – श्री राजकुमार हटवार, सहसचिव – श्री गुणीराम बोरकर , श्री लेखराम भगत, कोषाध्यक्ष – पवन पडोळे, सदस्य – बंडू झिंगरे, लाला हूमे, निरंजन शिवणकर, महेंद्र जुमले, गजानन चुधरी, काका भोयर, नरेश इंगळे, कुसुमताई कांबळे, नरेंद्र निमकर, नरेश शेंडे, अशी निवड करण्यात आली.
ग्रंथालय चळवळ सक्षम करण्यासाठी विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषद आयोजन करण्याचे निश्चित झाले आहे. प्रमुख पाहुणे व वेगवेगळ्या विषयावर मा्गदर्शन करणारे वक्ते यांच्या भेटी घेणे व फोन करून संपर्क साधने सुरू आहे. बऱ्याच वक्त्याकडून हिरवी झेंडी मिळालेली आहे. परिषदेच्या कामाला वेग आला आहे. लवकरच तारीख निश्चित करण्यात येईल. या बैठकीला उपस्थित सर्वश्री राजूभाऊ मासुरकर, रमेश गोमासे, अशोक हूमने, राजकुमार हटवार, पवन पडोळे, सत्याजिराव मेंढे, भूपेश बारसागडे, लेखराम भगत, भुमेश्वर काडगाये, रंजीत सेलोकर, महेंद्र जुमळे, भागवत शिवणकर, विशाल सावरकर, गुनिराम बोरकर, घनश्याम कानतोडे, सुधीर खोब्रागडे, काका भोयर, लाला हुमे, होमराज गोटेफोडे, शैलेश सुखदेवे, रविकिरण सिंगनजुडे उपस्थित होते.






