प्रशासन मेहरबान म्हणून रेती तस्कर पेहलवान
वरोरा : तालुक्यातील शेगाव पोलीस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या खुलेआम रेती ट्रॅक्टर च्या साहाय्याने चोरी केली जाते. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा जवळील घाटावरून खुलेआम शेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात रेतीची तस्करी करण्यात येते. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवल्या जातो. पण याकडे मात्र महसूल विभागाचे अधिकारी जाणुन बुजून काना डोळा करतांना दिसून येतात. कधी जरी कारवाही झाली तरी चिरिमिरी घेऊन गाड्या सोडल्याचे चित्र पाहायला मिळते. शिवाय यांची वाहने भर दिवसा अतिवेगाने धावत असतात व वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्यास वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात. शिवाय रेती तसकरी करणाऱ्या या वाहणाला मागील व समोरील बाजूस नंबर प्लेट सुद्धा नसते तरी या वाहणावर कारवाही मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे एरवी नियमाला जागणारे वाहतूक कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकारी या रेती तस्करावर एवढे मेहरबान का? व यांची काही विशेष मेहरबानी तर रेती तस्करावर नाही ना? भरधाव वेगाने धावणाऱ्या यांच्या वाहनाने एखादा अपघात झाल्यास याला जवाबदार कोण? असा प्रश्न सर्व गावकऱ्यांना पडला आहे.






