spot_img
spot_img
30.2 C
New York
Friday, June 5, 2026

मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्य सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न

सावली

विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव ता सावली जि चंद्रपूर येथे दिनांक 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेवरील प्रेम, शाब्दिक वैभव व हस्ताक्षर प्रेरणेसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये वर्ग आठवा ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते. या स्पर्धेत एकूण 490 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रथमेश पुंडलिक वाकडे वर्ग 9 वा वर्ग द्वितीय क्रमांक तन्मय लोमेश बारेकर वर्ग दहावा तृतीय क्रमांक कु उन्नती माणिकचंद उंदीरवाडे वर्ग अकरावा आणि प्रोत्साहनपर अभय केवळराम येडेवार वर्ग आठवा आणि अक्षरा विजय वाढनकर वर्ग दहावा यांनी मिळविले.

या स्पर्धेसाठी विद्यालयाच्या प्राचार्या कु गराटे मॅडम यांच्या प्रेरणेने सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यासाठी श्री कराणकर, श्री मोटघरे सर श्री चावरे सर डॉ गावंडे सर, श्री पुरेल्लिवार सर, प्रा कोचे सर, प्रा मोटघरे सर, श्री धोटे सर, प्रा उंदीरवाडे सर, प्रा बोभाटे मॅडम, प्रा. शेंडे सर, कु. मुरकुटे मॅडम आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!