भद्रावतीत जणू गुरुकुंज अवतरले….
भद्रावती
हनुमान नगर भद्रावती येथे रामधून वर्धापन दिन विविध कार्यक्रममांनी संपन्न झाला. या निमित्ताने भव्य पालखी शोभायात्रा मिरवणूक, हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहाने आनंदाने पार पडली .
भद्रावती येथील गुरुदेव सेवा मंडळाकडून विविध प्रकारचे उपक्रम व कार्यक्रम राबवले जातात. रामधून वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ गुरुदेव सेवक मधुकर धाबेकर, संबाशिव दिवसे, विनोद रासेकर यांचे हस्ते. घटस्थापना, अधिष्ठानाचे पूजन व द्वीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रातःकाळी सामुदायिक ध्यान संपन्न झाले. याप्रसंगी विशाल गावंडे यांनी चिंतन प्रकट केले. दुपारी १ वाजता आदर्श बाल गुरुदेव भजन मंडळ भद्रावती यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ महिला मंडळ, सुमठाना यांना हरिपाठ सादर केला. सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेवर शुभांगी कुत्तरमारे यांनी चिंतन प्रकट केले.
त्यानंतर गुणवंत कुत्तरमारे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर रवींद्रजी पचारे यांचा मनोरंजनातून प्रबोधनात्मक भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक २५ जानेवारी ला सामुदायिक ध्यान प्रसंगी खुशाल कंचर्लावार यांचे चिंतन लाभले व त्यानंतर भव्य पालखी सोहळा मिरवणूक हनुमान नगर परिसराततून अनेक भजनी दिंडी, वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध झाकी, देखावे, अनेक संत थोर महापुरुषांचे प्रतिमा विशेषता वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांची गुरुकुंज आश्रम मोझरी येथील समाधीची प्रतिकृती सुधाकर सतीबावणे व सहकारी मंडळी यांचे वतीने करण्यात आली. या सोहळ्यांचे मुख्य आकर्षण होती.
या सोहळ्यामध्ये हजारोचे संख्येने गुरुदेव भक्त अत्यंत उत्साहाने सहभागी झाले, जणु काही गुरुकुंजच अवतरले. या मिरवणुकीतून सर्वधर्मांचे दर्शन घडले. याप्रसंगी ओमप्रकाश पांडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर ह.भ.प. योगेश प्रधान महाराज यांचा गोपालकाल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रार्थनेतील सर्व मुलांना गणवेश वाटप करण्यात आला व दर गुरुवारला भजन करणाऱ्या महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता हनुमान नगर येथील युवा कार्यकर्ते, गुरुदेव सेवाप्रेमी बंधू भगिनींचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.






