शिंदे विद्यालयाचे क्रीडा क्षेत्रात नैपुण्य..
भद्रावती
नुकत्याच मूर्तीजापूर येथे पार पडलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विधाता बंडू लांडगे याने राज्यस्तरावर कांस्यपदक प्राप्त केले .
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोडी भद्रावती येथील खेळाडू विधाता बंडू लांडगे यांनी नुकत्याच मूर्तीजापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बाॅक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्यपदक प्राप्त केले आहे. राज्यस्तरावर बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केल्याने भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, विश्वस्त डॉ जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ सुधीर मोते, क्रीडा शिक्षक प्रा. रमेश चव्हाण त्यांच्या हस्ते शाळेच्या वतीने त्याचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
भद्रावती तालुक्यातील बॉक्सिंग कोच लता तिवारी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. त्याने राज्यस्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल प्राध्यापक डॉ ज्ञानेश हटवार, डॉ प्रशांत पाठक, किशोर ढोक, भिष्माचार्य बोरकुटे, आत्माराम देशमुख, सुहास कोल्हे सर्व शिक्षक, प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. बॉक्सिंग क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर कांस्यपदक प्राप्त केल्याने त्याचे परिसरातील क्रीडा प्रेमी कडून कौतुक केले जात आहे.






