spot_img
spot_img
27.4 C
New York
Wednesday, July 29, 2026

“स्मृतींच्या ओंजळीत” हा स्मृतिग्रंथ मानवी जीवनाला दिशादर्शक ठरेल… प्रदीप दाते

सुरेश परसावार सरांच्या स्मृत्यर्थ “स्मृतींच्या ओंजळीत” या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न….

वि.सा. संघ शाखा भद्रावतीचा स्तुत्य उपक्रम……

विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा भद्रावती तर्फे आयोजित “स्मृतिंच्या ओंजळीत” या प्रा. डॉ. सुरेश परसावार यांच्या प्रथम स्मृतीदिना प्रित्यर्थ या स्मृती ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रदीप दाते यांनी “हा स्मृती ग्रंथ ग्रंथ मानवी जीवनाला दिशादर्शक ठरेल” असा आशावाद व्यक्त केला.

विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा भद्रावती यांच्या वतीने “स्मृतींच्या ओंजळीत” या ग्रंथ प्रकाशन व स्नेह मिलन सोहळ्याचे भद्रावती येथील शिंदे मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप दाते अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, मुख्य अतिथी सुनील देशपांडे, अखिल भारतीय सह संपर्कप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अतिथी म्हणून गोविंद शेंडे, केंद्रीय सहमंत्री, विश्व हिंदू परिषद, कर्नल, वसंत बल्लेवार, डिन, क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट, पुणे, दीपकजी कामशेट्टीवार, प्रांत संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मा. हंसराज भैय्या अहीर, अध्यक्ष, मागासवर्ग आयोग, भारत सरकार आमदार, करण देवतळे, चंद्रकांत गुंडावर, अध्यक्ष, लोकसेवा मंडळ भद्रावती, सौ. रंजना दाते, वर्धा, श्रीमती अर्चना परसावार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रदीप दाते यांनी “सुरेश परसावार सरांचा हा स्मृतिग्रंथ मानवी जीवनाला दिशादर्शक व नवीन जीवनदृष्टी देणारा ठरेल” असे प्रतिपादन केले. प्रमुख मार्गदर्शन करताना सुनील देशपांडे यांनी त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचे स्मरण केले. “समाजातील अस्वस्थता दूर करण्यासाठी या स्पर्धात्मक युगात सकारात्मक दिशेने योग्य मार्गक्रमण करणे उचित ठरेल. सुरेश परसावार यांनी मातृभाषेचा अभिमान अंगीकारला होता, एवढेच नाही तर ते प्रबोधनात्मक आयुष्य जगले समाजासाठी प्रेरक आहे”, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमात स्वर्गीय प्रा. डॉ सुरेश परसावार यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , धार्मिक, संघ परिवारातील विविध क्षेत्रातील कार्याचा अनुभव आठवण रूपाने अनेकांनी कथन केला. या कार्यक्रमात कर्नल, वसंत बल्लावार, चंद्रकांत गुंडावर, गोविंद शेंडे, दीपक तामसेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संपादकीय मनोगत डॉ. सुधीर मोते यांनी व्यक्त केले. यावेळी वैदेही सरपटवार यांनी ओम नमोजी आद्या… हे गीत गायले तर राहुल पचारे यांनी मातृ मंदिर का समर्पित दीप मै… हे स्व. प्रा. डॉ सुरेश परसावार यांना समर्पित गीत गायन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य सचिन सरपटवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती गुंडावर यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी प्राचार्या श्रीमती आशालता सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. पसायदान प्राजक्ता चिखलीकर यांनी गायले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विदर्भ साहित्य संघ, भद्रावती चे सर्व पदाधिकारी, झाडीबोली साहित्य मंडळ, भद्रावती चे समस्त पदाधिकारी, स्मृतिगंध साहित्य परिवार व परसावार परिवार, मित्रमंडळींनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!