नागरिकांनी कर्तव्याचे पालन करावे….. डॉ विवेक शिंदे
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा गणराज्य दिन मोठ्या थाटात संपन्न झाला.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती च्या प्रांगणात आयोजित ७७ व्या गणराज्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती तथा सिनेट सदस्य गोडवाना विद्यापीठ, गडचिरोली, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, डॉ. जयंत वानखेडे, विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, दिलीप भाऊ शिंदे विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, नीलकंठराव शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय, भद्रावती, प्राचार्य डॉ. सुधीर मोते, मुख्याध्यापक प्रवीण शिंदे, केंद्रप्रमुख खासरे सर, पालक प्रतिनिधी लांडगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. विवेक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत झाली. एनसीसी पथकाचे शिस्तबद्ध पथसंलन झाले. तसेच प्रा. रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विद्यालयातील तायक्वांडो खेळाडूंचे आत्मसंरक्षणा बद्दलचे प्रत्यक्षीक झाले. खेळाडूंनी मलखांबावर सुंदर असे आसन, मनोऱ्यांचे सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांचे विविध गीतांवर नृत्याचे कार्यक्रम झाले. यावेळी पंचायत समितीच्या पथकानी सर्व कार्यक्रमाचे अवलोकन केले.

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. विवेक शिंदे यांनी “भारतीय लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी कायद्याचे पालन करून आपले कर्तव्य पार पाडावे” असे प्रतिपादन केले. गणराज्य दिनाबद्दल विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे विश्वस्त तथा माजी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे सर यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जयंत वानखेडे यांनी “भारतीय लोकशाही व्यवस्थेत अधिकारांसोबतच कर्तव्याची जाणीव ठेवून देशासाठी कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत” व्यक्त केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी तसेच क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले. कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत नीलकंठराव शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय भद्रावती, यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती , डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावती, नीलिमाताई शिंदे महिला महाविद्यालय भद्रावती, यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक शाळा चिचोर्डी, सूर्य मंदिर वार्ड,भंगाराम वार्ड भद्रावती येथिल शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. रमेश चव्हाण सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






