यशवंतराव शिंदे विद्यालय भद्रावती चा उपक्रम…
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी येथे दिनांक 22 जानेवारी 2026 रोज गुरुवारी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्रा. डॉ कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते सर, प्रमुख अतिथी प्रा. रोशनी शिंदे मॅडम, आत्माराम देशमुख सर, आणि चिरंजीव शिवराज कार्तिक शिंदे हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय नीळकंठरावजी शिंदे तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती यांनी केले व विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी मनाची तयारी करावी व जीवनात यशस्वी होण्यासाठी परिस्थितीला सामोरे जाऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करा असा संदेश दिला व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते सरांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. सोबतच प्राध्यापिका रोशनी मॅडम, श्री देशमुख सर यांनीही मुलांना परीक्षेला सामोरे जाताना करावयाची तयारी या बद्दल मार्गदर्शन केले.
तर छोटे पाहुणे शिवराज कार्तिक शिंदे यांनी केक कापून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सोबत विविध विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी भावूक झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचा आस्वाद घेतला. सर्व विद्यार्थी व पाहुण्यांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.






