spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन २५ जानेवारीला…

संताजी स्नेही मंडळ भद्रावती तर्फे भव्य शोभायात्रा

भद्रावती


भद्रावती येथील संताजी स्नेही मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

संताजी स्नेही मंडळ भद्रावती तर्फे आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. दिनांक २५ रोज रविवारला सकाळी १०.०० वाजता घटस्थापना व मूर्ती पूजन होऊन दुपारी १२.०० वाजता महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला आहे. सायंकाळी ४.००वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, ६.०० वाजता गुणवंत व क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. तर ७.०० सांस्कृतिक कार्यक्रम होईल. त्यानंतर भव्य महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता होईल.

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या भव्य शोभायात्रेचे उद्घाटन सौ. ज्योती चौधरी, (गायकवाड) संरक्षण अधिकारी, भद्रावती व महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार प्राप्त, लेखिका, कवी, रेडिओ आर्टिस्ट सौ केशनी ज्ञानेश हटवार भद्रावती यांचे हस्ते हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सुधीर मोते हे राहणार असून विशेष पाहुणे म्हणून आयुध निर्माणि चे अप्पर महाप्रबंधक, दिगांबर उरकुडे, उपमहाप्रबंधक प्रशांत सूरकार, किरण धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच एरंडल तेली समाज अध्यक्ष बाबाराव तराळे हे व्यासपीठावर उपस्थिती राहणार आहेत.

भद्रावती व भद्रावती तालुक्यातील सर्व संताजी समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे व या कार्यक्रमास सहकार्य करून लाभ घ्यावे असे आवाहन संताजी तेही मंडळ भद्रावतीचे अध्यक्ष पुरूषोत्तम नैताम, तर महिला कार्यकारिणी अध्यक्षा अनिता आष्टनकर व समस्त संताजी स्नेही मंडळ पदाधिकारी यांनी केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!