spot_img
spot_img
21.9 C
New York
Thursday, July 30, 2026

अखेर शाश्रूत नयनांनी शहीद वीर जवान राहुल गोवर्धन चोधरी अनंतात विलीन..

जन्मगावी हजारो नागरिकाच्या उपस्थितीत दिली वीराला मुखाग्नी..

शेगाव पासून पाच किलोमीटर असलेल्या खेमजई या गावचे वीर सुपुत्र राहुल गोवर्धन चौधरी हे सशस्त्र सेना दलात (४० बटालियन ) पटना बिहार येथे कार्यरत होते. कार्य करत असताना २९ डिसेंबरला त्यांचा अपघात झाला होता त्यानंतर त्यांना पटना येथील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर २२ दिवसानंतर २० जानेवारीला उपचार घेत असताना त्यांची प्राण ज्योत मावळली..
त्यांचे पार्थिव पटना येथून इंडिगो एअर अँब्युलन्स ने नागपूर येथे आज आले नागपूर वरून जन्मगावी खेमजई येथे आणत असताना टेमुर्डा, आसाळा, भटाळा अशा ठीक ठिकाणी परिसरातील नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांचे राहते घरी खेमजई येथे काही वेळासाठी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले.

त्यानंतर खेमजई शेगाव रस्त्यालगत असलेल्या छोटा तलाव क्षेत्रात शहीद वीर जवान राहुल चोधरी यांना शासकीय इतमामात मानवंदना, श्रद्धांजली देऊन अंतिम संस्कार करण्यात आले.. यावेळी केंद्रीय पोलीस बल नागपूर, चंद्रपूर जिल्हा पोलीस बल, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, जिल्हा प्रशासन च्या वतीने तहसीलदार योगेश कौटकर, चिमूर एस. डी. पि. ओ. दिनकर ठोसर, तहसील कार्यालय वरोरा कडून नायब तहसीलदार आदीनी मानवंदना दिली. सीआरपीएफ जवान नागपूर यांच्याकडून हवेत तीन राउंड फायरिंग करून मानवंदना देण्यात आली तसेच माजी सैनिक वरोरा, कन्या विद्यालय खेमजई, चौधरी परिवार यांच्याकडून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली..

सीआरपीएफ जवानांकडून राष्ट्रीय ध्वज तिरंगा देऊन चौधरी परिवाराला सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे वीर जवानाचा मोठा भाऊ सुध्दा राजकुमार चोधरी हा भारतीय नौदलात कार्यरत आहे. अंत्यविधी साठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते या वेळी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांचेकडून ठीक ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!