spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

सेवाव्रती स्वर्गीय जगन्नाथजी गावंडे सहावा स्मृतिदिन संपन्न…

सेवाव्रती स्व.जगन्नाथजी गावंडे दादांना शेकडो गुरुदेव भक्तांनी साश्रुनयनांनी अर्पण केली श्रद्धांजली

भद्रावती

श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे अधरयू स्वर्गीय जगन्नाथजी गावंडे दादा यांच्या सहाव्या स्मृतिदिन दिनांक १९ जानेवारी २०२५ रोज सोमवारी नगर स्वच्छता अभियान मिरवणूक, सामुदायिक प्रार्थना, व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने श्री गुरुदेव हनुमान मंदिर देवस्थान सुरक्षा नगर येथे संपन्न झाला.


स्मृतिदिन कार्यक्रमाची सुरुवात सुरक्षा नगर परिसरात नगर स्वच्छता अभियान राबवून झाली त्यानंतर येथील रामधून मार्गाने भजनी दिंडी सह स्वर्गीय जगन्नाथजी गावंडे दादा यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये प्रत्येक घरासमोर स्वच्छता करून रांगोळ्या काढून थोर संत,महापुरुषांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली याप्रसंगी श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरातील मुले व शेकडो गुरुदेव उपस्थित होते.

भ.प.मनोज महाराज चौबे यांनी सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन प्रकट केले. त्यानंतर स्व.जगन्नाथजी गावंडे यांच्या जीवन कार्यावर प्रवीण आडेकर यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत गुंडावार, मधुकर बांदुरकर, उद्धवराव कुचनकर, पुरुषोत्तम मते, गोपाल ठेंगणे, शेखरजी घुमे, मुरलीधर मेश्राम, बालाजी नागपुरे, नथ्थुजी रासेकर, शोभाताई खडसे, सुवर्णाताई पिंपळकर, शालिक दानव , श्रीहरी राऊत, बाबाराव नागोसे , गुणवंत कुत्तरमारे उपस्थित होते.

या प्रसंगी नवनियुक्त नगराध्यक्ष प्रफुल चटकी, उपनगराध्यक्ष सुधीर सातपुते, सुरक्षा नगर येथील नगरसेवक देवेंद्र गडपाले व रेखाताई कुटेमाटे यांचा तसेच कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती च्या सदस्यांचा स्वच्छतेच्या योगदानाबद्दल अध्यक्ष मंगेश येरमे, बंडू परचाके, दिनकर घाटे, अरुण येरकाडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विशाल गावंडे तर आभार गजानन डंभारे यांनी मानले. यानंतर झनक चौधरी व नरेंद्र मेश्राम यांनी राष्ट्रवंदने समारोप केला. विश्वकर्मा महिला भजन मंडळ हनुमान नगर यांचे भजनी दिंडी साठी सहकार्य लाभले.कार्यक्रम प्रसंगी शेकडो गुरुदेव भक्त उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!