नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचा सत्कार….
मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्य विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा आविष्कार…
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ विवेक शिंदे यांनी “स्नेहसंमेलनातून व्यक्तिमत्व विकसित होतो” असे सांगितले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, उद्घाटक प्रा डॉ. कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्रमुख अतिथी प्रफुल चटकी नगराध्यक्ष, भद्रावती, डॉ जयंत वानखेडे, विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्राचार्य डॉ एल. एस. लडके शिंदे महाविद्यालय, भद्रावती, प्राचार्य डॉ. सुधीर मोते हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवी माँ सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रा. डॉ कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचे माजी विद्यार्थी भद्रावती नगरीचे प्रथम नागरिक, नगराध्यक्ष, प्रफुल चटकी यांचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी “विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे, अभ्यास करून यश प्राप्त करावे व गुरुजनांचा आदर करावा” असे सांगितले. या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांनी “विद्यार्थ्यांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. आत्मविश्वासाने परीक्षेला समोर जावे. मानवी जीवनात शिस्तीला फार महत्त्व असल्याचे” त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. जयंत वानखेडे, डॉ. एल. एस. लडके, डॉ. सुधीर मोते यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर केला. एकल नृत्य, समूह नृत्य, लावणी, नाटिका, गीत गायन, फॅशन शो , भाषण अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा दोडके, शर्विल हटवार, अथर्व चौधरी, कु. ईशीका दातारकर, मृणाली हजारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रणिता बोकडे, प्रा. डॉ प्रशांत पाठक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, किशोर ढोक, रमेश चव्हाण, चंद्रशेखर जुमडे, प्रवीण मत्ते, नरेश जांभूळकर, राकेश आवारी, हरिहर मोहरकर, किशोर चौधरी, प्रतीक नागपुरे, राहुल भगत, अशोक पिदूरकर, धनराज कडूकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.






