राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन..
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे ऑलम्पिक मध्ये भारतातील पहिले पदक विजेता खाशाबा जाधव यांची शंभरावी जयंती साजरी करण्यात आली. राज्य क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची शंभरावी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, उद्घाटक प्रा. किशोर ढोक, प्रमुख अतिथी प्रा. नरेश जांभूळकर, डॉ ज्ञानेश हटवार प्रा. रमेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी “क्रीडेतून सर्वांगीण विकास होतो व सांघिक वृत्ती वाढीस लागते, असे सांगितले. महाराष्ट्रातील कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी स्वतंत्र भारताला ऑलम्पिक मध्ये पहिले पदक मिळवून दिले, त्यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो, असे मार्गदर्शन प्रा. किशोर ढोक यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या हॉलीबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, रनिंग, मलखांब अशा विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्रीडाशिक्षक प्रा रमेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण मत्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. भीष्माचार्य बोरकुटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राकेश आवारी, प्रतीक नागपुरे, प्रा वर्षा दोडके मॅडम यांनी केले.






