spot_img
spot_img
27.8 C
New York
Friday, July 31, 2026

रेती तस्करी करताना आणखी एक बळी

ताडोबा बफ्फर झोन मधून होते रात दिवस अवैध रेती तस्करी

पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत मौजा वायगाव जंगल परिसर (ताडोबा बफर) मध्ये दिनांक १४ जानेवारी चे रात्री अवैध रेती तस्करी करीत असताना निखिल चौखे वय 20 वर्षे राहणार वायगाव भोयर हा ट्रॅक्टर मालक प्रकाश हिवरे राहणार चारगाव याचे सांगनेवरून ताडोबा बफर झोन मधून अवैध रेती भरून येत असताना वन विभाग ची गाडी दिसल्याने पळापळी मधे सर्व मजूर पळून गेले परंतु ट्रॅक्टर चालक निखिल चौके यांनी हायड्रोलिक वर केल्या मुळे प्रवीण वसंत दडमल वय 35 वर्ष हा वरून खाली पडून रेतीखाली दबल्याने मरण पावला. या बाबत गोपिका वसंता दडमल यांचे फिर्याद वरून शेगाव पोलिस यांनी मोक्का पंचनामा करून अप क्रमांक 21/25 कलम 106 (1), 49 भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा नोंद केला व आरोपी यांना ताब्यात घेऊन ट्रॅक्टर (विना नंबर) जप्त केलेले आहे. दरम्यान घटनेचा पुढील तपास psi सुमित कांबळे, मदन येरमे करीत आहे.

दरम्यान अशा प्रकारे ताडोबा बफर झोन मधून सर्रासपणे अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणत केल्या जाते याच भागात वाघ, बिबट्या व अन्य जंगली प्राण्यांची मोठ्या प्रमाणत वरदड असते. जंगली भागात अशा प्रकारच्या घुस्पेठ मुळे वन्य प्राणी मानवी वस्ती कडे येत आहे .
दोन दिवसाआधी याच भागात बेंबळ या गावात वाघ शिरला होता परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असताना सुद्धा वन विभाग बग्याची भूमिका घेत असल्या कारणांनी वन विभागाच्या काही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्मान होत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!