नागपूर विधीमंडळावर धडकणार शिक्षक……
चंद्रपूर, प्रतिनिधी-
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे विधानभवनावर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी व्हिज्युक्टा चे धरणे आदोलन. विदर्भ जुनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन (विज्युक्टा) तर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार दिनांक 11 डिसेंबरला विधिमंडळावर आयोजित धरणे आंदोलनाची तयारी सुरू आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि शिक्षक एकजुटीचे सामर्थ्य दाखविण्यासाठी हे आंदोलन लक्षवेधी ठरणार आहे.
1)अ) 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त टप्पा अनुदानावरील शिक्षक – शिक्षकेतर, अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्याच्यावरील अन्याय दूर करावा.सेवानिवृत्त झालेल्यांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.
ब) 01 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
2) कनिष्ठ महाविद्यालयासाठी यावर्षी ऑनलाईन संच मान्यता न करता पूर्वीच्याच निकषानुसार ऑफलाइन संचमान्यता करण्यात यावी.
3) 11वीमध्ये प्रवेश दिलेले सर्व विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरावे. पुढील वर्षी इयत्ता अकरावीचे प्रवेश राज्यभर ऑनलाईन न करता केवळ ऑफलाईन करण्यात यावे. 4)अंशतः अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित निकषाप्रमाणे अनुदान सुत्र त्वरित लागू करावे व अघोषित उच्च माध्यमिक शाळांना टप्पा अनुदानासह घोषित करावे.
5) मान्यता प्राप्त आय.टी विषय शिक्षकांच्या समायोजनाबाबतचा शासनादेश त्वरित निर्गमित करण्यात यावा.
6) शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे 10 ,20 ,30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. निवड श्रेणीची 20% ची अट रद्द करावी.
7) शिक्षकांची सर्व रिक्त पदे विना विलंब भरावी.
8) संचालक कार्यालयाकडून त्रुटी पूर्तता केलेल्या प्रलंबित वाढीव पदाच्या फाईल मंत्रालयात आलेले आहेत त्या पदांना मान्यता देऊन त्यांच्या समायोजनाचे आदेश त्वरित द्यावे.
9) सध्या स्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात किमान 21 विद्यार्थी व वरिष्ठ महाविद्यालय सलग्न 31 विद्यार्थी ग्राह्य धरावे.
शासनाने दिलेली तुकडी मान्यता कमी प्रवेश झाल्यामुळे रद्द समजण्यात येऊ नये.
10)एम.फिल. एम.एड,पी.एच डी. धारक शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकाप्रमाणे वेतन वाढ लागू करावी.
11)उपदानत्रवाढीचा लाभ 01 सप्टेंबर 2024 एवजी सातव्या वेतन आयोगाच्या लाभ दिनांक पासून देण्यात यावा. 12)डीसीपीएस एनपीएस योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशेब व देय रक्कम देण्यात यावी मार्च 2021 नंतर कपात रक्कम शिक्षकांच्या खात्याला जमा झालेली नाही ती व्याजासह त्वरित जमा करावी तसेच शासन निर्णय 23/2 /2021 नुसार वेतन आयोगाचे थकीत हप्ते त्वरित द्यावे.
13) कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचा कार्यभार सतत तीन वर्ष कमी झाला अथवा शून्य झाला तरच त्याला अतिरिक्त घोषित करावे.
14) शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील अंशकालीन घड्याळी तासावरील शिक्षकांना शासकीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाप्रमाणे मानधन देण्यात यावे.
15) कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतन वाढ देण्यात यावी.
16) अर्धवेळ शिक्षकांची सेवा निम्मी ग्राह्य धरून पूर्ण वेळ सेवेत जोडण्यात यावी त्यांना पूर्णवेळ सेवेचा संपूर्ण लाभ( सेवा जेष्ठता, वेतन वाढ, वरिष्ठ व निवड श्रेणी, जुनी पेन्शन ) इत्यादी मिळावेत. 17)पेन्शन विक्री कपात रक्कम कालावधी 15 वर्षे एवजी बारा वर्षे करण्यात यावा.
18) एक नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या नगरपरिषद, महानगरपालिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डीसीपीएस, एनपीएस, जीपीएफ योजना त्वरित लागू करावी.
19) जुनी पेन्शन बाबत मा उच्च न्यायालय मुंबई याचिका क्रमांक 2345/ 2014 दि. 27/2/ 2025 नुसार दाखल प्रस्तावाचा सकारात्मक विचार होऊन त्याचे अहवाल त्वरित सादर व्हावेत.
20) 20 सप्टेंबर 2024 च्या शासन आदेशात स्कॉलरशिप फॉर्म भरताना फक्त नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ही अट आहे त्यासाठी उत्पन्नाचा दाखला मागण्यात येऊ नये विद्यार्थी हितास्तव तसा बदल ऑनलाइन मध्ये करण्यात यावा.
21)केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या न्याय्य मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागण्यांची पूर्तता तातडीने व्हावी, यासाठी व्हिज्युक्टाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सूचनेनुसार राज्यव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे 11 डिसेंबरला दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन होणार आहे. व्हिज्युक्टाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलन सहभागी व्हावे. याकरिता प्रत्येक तालुक्यातून बहुसंख्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उपस्थित राहून आंदोलनास बळ द्यावे ,असे आवाहन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रविण चटप, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, प्रसिद्धी प्रमुख प्रा. नामदेव मोरे, संघटन सचिव प्रा मालेकर, प्रा. किशोर डोकं , जिल्हा तथा तालुका कार्यकारणी कडून करण्यात येत आहे.






